नवी दिल्ली - दारूच्या सेवनाबाबत मागील अनेक वर्षापासून वेगवेगळी संशोधन सुरू आहेत. त्यात विविध दावे करण्यात येतात. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने दारू पिण्यावरून हैराण करणारा दावा केला आहे. WHO च्या दाव्यानुसार, दारूच्या पहिल्या थेंबापासून कॅन्सरचा धोका निर्माण होतो. दारु पिण्याच्या असा कुठलाही पुरावा नाही ज्यात कितपत दारू शरीरासाठी हानिकारक ठरते असं म्हटलं आहे.
WHO नं अलीकडेच द लांसेट पब्लिक हेल्थमध्ये निवेदन प्रकाशित केलं आहे. त्यात म्हटलंय की, जेव्हा दारू सेवनाबाबत चर्चा होते. तेव्हा असं कुठलेही प्रमाण नाही ज्यामुळे दारू शरीरावर परिणाम टाकत नाही. दारु सेवनाबाबत कथाकथित सुरक्षित प्रमाणात दारू पिण्याचा कुठलाही दावा आम्ही करू शकत नाही असं WHO चे विभागीय सल्लागार डॉ. कैरिना फेरेरा-बोर्गेस यांनी सांगितले आहे. रिपोर्टनुसार, अल्कहोल(Alcohol) सेवनामुळे कमीत कमी ७ प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढत जातो. त्यात माऊथ कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, ऐसोफगस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सरचा समावेश आहे. दारू सामान्य पेय पदार्थ नाही. ती शरीराला नुकसानकारक ठरते. अल्कहोल असाच विषारी पदार्थ आहे. दशकांपूर्वी इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरकडून एका समुहाने कार्सिनोजेन यात हे वर्गीकरण केले होते. हे सर्वाधिक धोकादायक आहे. त्यात एस्बेस्टस आणि तंबाखूही समाविष्ट आहे.
WHO नं त्यांच्या स्टडीत दावा केला आहे की, अल्कहोल जैवतंत्राच्या माध्यमातून कॅन्सरचं कारण बनते. याचा स्पष्ट अर्थ असा की दारू कितीही महागडी असो अथवा तिच्या सेवनाचं प्रमाण कमी असो कॅन्सरचा धोका निर्माण करते. अधिक दारू सेवन कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतो. नवीन आकडेवारीनुसार, यूरोपात कॅन्सरचं कारण केवळ अल्कहोल सेवन आहे. यात असेही लोक सहभागी आहेत ज्यांनी कमी प्रमाणात दारू सेवन केले होते. दारूची आवड असलेल्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची समस्या जाणवते. त्याला अल्कहोल जबाबदार आहे. कॅन्सरमुळे मृत्यू संभावतो असंही यूरोपियन स्टडीत म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही दारू सेवनाबाबत सुरक्षित प्रमाणात प्यायल्यावर काही नुकसान होत नाही असा दावा करू शकत नाही. तुम्ही किती दारू पिता याने फरक पडत नाही. दारू शरीरासाठी हानिकारक असून त्याच्या पहिल्या थेंबापासून धोका सुरू होतो. तुम्ही जितकी जास्त दारू पिणार तितका शरीरासाठी धोका वाढत जाणार हा दावा करू शकतो असं डॉ. कैरिना फेरेरा-बोर्गेस यांनी म्हटलं आहे.