तुर्कीच्या संसदेमध्ये इस्त्रायलविरोधात बोलत असताना खासदार अचानक बेशुद्ध होऊन पडले. संसदेचे कामकाज लाईव्ह प्रसारित होत असल्याने हे धक्कादायक दृष्य समोर आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
तुर्कीचे खासदार हसन बिटमेज हे 53 वर्षांचे आहेत. त्यांना मधुमेह आहे. संसदेत ते तुर्की लोकांच्या हमास युद्धावरील प्रतिक्रियांवर टीका करत होते. इतिहास भलेली शांत राहिल परंतु सत्य शांत राहणार नाही. त्यांना वाटतेय की जर त्यांनी आमची सुटका केली तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण आमची सुटका झाली तरी मनस्तापातून सुटका नाही. तुम्ही इतिहासापासून दूर पळू शकता, परंतु देवाच्या क्रोधापासून दूर पळू शकत नाही, असे बिटमेज म्हणाले.
हे बोलत असतानाच बिटमेज अचानक खाली कोसळले. वैद्यकीय अधिकारी त्यांना पाहण्यासाठी पोहोचले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.