अमेरिकेच्या पेंसिवेनियामध्ये हायवेवर भीषण अपघात झाला आहे. बर्फ आणि वादळामुळे पुढचे काहीच न दिसल्याने एका मागोमाग एक अशा ६० गाड्या धडकल्या आहेत. काही गाड्यांना आगही लागली आहे. या अपघातात कमीतकमी ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा प्रकारचे अपघात भारतातही होतात. यासाठी यमुना एक्स्प्रेस वे कुप्रसिद्ध आहे.
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनुसार हा अपघात सोमवारी स्चूयलकिल काउंटीमधील हायवेवर झाला आहे. पोलिसांनुसार या अपघातातील वाहनांची संख्या ४० ते ६० पर्यंत असू शकते.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या अपघाताच्या व्हिडिओमध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्गावर फारच कमी दिसत असून वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे दिसत आहे. अपघातानंतर वाहने तिथेच सोडून लोक पळताना दिसत आहेत. संपूर्ण रस्ता डोंगरांनी वेढलेला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
स्चूयलकिलमधील ही दुसरी मोठी घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कार घसरून एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. अपघातामुळे 5 वाहनांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.