शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 3:22 PM

या गाजरांना  E. coli बॅक्टेरियाची लागण झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

E. coli:  जर तुम्ही गाजराची भाजी खात असाल किंवा सॅलडमध्ये गाजर खायला आवडत असेल तर तुम्ही सावध व्हा. कारण, गाजर खाल्याने अमेरिकेत अनेक लोक आजारी पडले आहेत. संक्रमित गाजर खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई करत ग्रिमवे फार्म्सने अनेक राज्यांमध्ये पाठवलेले सेंद्रिय आणि लहान गाजर परत मागवले आहेत. या गाजरांना  E. coli बॅक्टेरियाची लागण झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

अमेरिकेतली सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने(सीडीसी) सांगितले की, आतापर्यंत १५ लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि १८ राज्यांमधून गाजर खाल्ल्याने ३९ लोकांना संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गाजर ग्रिमवे फार्म्सने मोठ्या सुपरमार्केटमध्ये विकले होते. यामध्ये ट्रेडर जोस, होल फूड्स ३६५, टारगेट्स गुड अँड गेदर, वॉलमार्ट्स मार्केटसाइड, वेगमॅन्सचा समावेश आहे. 

या प्रकरणी ग्रिमवे फार्म्सचे म्हणणे आहे की, त्यांनी पिकवलेल्या गाजरांना E. coli बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे. यापासून लहान मुले, वृद्ध लोक आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना गंभीर संसर्ग होऊ शकतो. या संसर्गातून बरं होण्यासाठी अनेकदा लोकांना २४ तास ते १० दिवस लागतात.

सीडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,  कदाचित संक्रमित गाजर यापुढे कोणत्याही दुकानात नसतील, परंतु ते घरांमध्ये साठवले जाण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत ही गाजर फेकून द्यावीत किंवा स्टोअरमध्ये परत केली जावी जेणेकरून त्यांचे पैसे परत मिळू शकतील. तर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गाजर खाल्ल्याने संसर्ग झालेले बहुतेक लोक न्यूयॉर्क, मिनेसोटा आणि वॉशिंग्टनचे रहिवासी आहेत. याशिवाय कॅलिफोर्निया आणि ओरेगॉनमध्येही गाजर खाल्ल्याने लोक आजारी पडले आहेत.

सीडीसी म्हणणे आहे की, परत मागवलेल्या सर्व गाजरांवर एक्सपायरी डेट देण्यात आली नाही. परंतु तरीही ते १४ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर या कालावधीत खरेदी करण्यात आलेले असेल. ११ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत वापरलेले लहान गाजर देखील परत मागवण्यात आले आहेत, असे सीडीसीने सांगितले. याचबरोबर, सीडीसीने म्हटले आहे की गाजरांच्या संपर्कात येणारी सर्व ठिकाणे स्वच्छ करावीत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक कोणत्याही उपचाराशिवाय बरे होतात, परंतु काही लोकांना किडनीचा गंभीर आजार होऊ शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.

E. coli ची लक्षणे कोणती?पोटात दुखणे, जुलाब आणि उलट्या होणे, अशी E. coli ची लक्षणे आहेत. हा संसर्ग पोटात गेल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ही लक्षणे दिसून येतात.

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्य