ऑनलाइन लोकमत -
पॅरिस (फ्रान्स), दि. २३ - ट्विटर म्हणलं की आली प्रत्येक अपडेट....लोकांना आजकाल भेटायला वेळ नसतो मात्र आपली प्रत्येक गोष्ट ट्विटरवर शेअर करुन संपर्कात राहत असतात. ट्विटरवर तुम्ही अनेकांना फॉलो करत असाल तसंच तुम्हालाही अनेकजण फॉलो करत असतील. तुमच्या शेजा-यापासून ते सेलिब्रेटीपर्यंत प्रत्येकाला तुम्ही ट्विटर वापरताना पाहिलं असेल मात्र फ्रान्समध्ये एक मांजरदेखील ट्विटर वापरते असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. ही मांजर फक्त ट्विटर वापरत नाही तर घर सोडण्याआधी आणि घरी पोहोचल्यावर आपला फोटोदेखील ट्विट करते.
ही मांजर आहे पेपिटो. फ्रेंच काळ्या मांजरीला पेपिटो असं म्हणलं जात. या मांजरीला पोर्टलच्या सहाय्याने ट्विटरचा अॅक्सेस दिला आहे ज्यामुळे ती आत-बाहेर करु शकते. तिच्या दरवाजाला ट्विटर अकाऊंट जोडण्यात आलं आहे त्यामुळे जेव्हा कधी ती घराबाहेर जाते किंवा येते तेव्हा फोटो ट्विट होतो. या मांजरीच्या ट्विटर अकाऊंटवर आतापर्यंत नऊ हजार ट्विट करण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये Pépito is back home आणि Pépito is out अशी कॅप्शनदेखील असते, सोबतचं वेळदेखील नोंद केलेली असते. पेपिटोचे ट्विटरला 12 हजार फॉलोअरदेखील आहेत.
Pépito is out (07:08:53) pic.twitter.com/wUZnj6b5Ae— Pépito (@PepitoTheCat) March 23, 2016
Pépito is back home (07:33:43) pic.twitter.com/wT1zGwr3Pz— Pépito (@PepitoTheCat) March 23, 2016