लंडन : इंग्लंड आणि रशिया यांच्यातील संबंध कडवटच राहिले आहेत. हाच कडवटपणा मांजरींसाठीचा पुरस्कार मिळवण्यातही कायम राहिला आहे. दोन्ही देशांचे आपापल्या देशातील मांजरीचे चाहते या स्पर्धेत उतरले असून, आपली मांजर पुरस्काराची मानकरी ठरावी यासाठी समाजमाध्यमांसह सगळे मार्ग वापरत आहेत. लंडन शहरात सध्या मांजर प्रदर्शन भरले आहे. त्यात अनेक देशांच्या मांजरी असून, ‘वर्ल्ड बेस्ट कॅट’ पुरस्कार दिला जाणार आहे. ब्रिटनची माओग्लीव्ज स्टोनहेंज आणि रशियाची स्कॉटिश फोल्ड या मांजरींनी प्रारंभीच्या फेऱ्या पार पाडून आपली जागा निश्चित केली आहे. स्टोनहेंज हिच्याकडे आधीच वर्ल्ड बेस्ट कॅटचा सन्मान आहेच व तिला यंदा फोल्डने आव्हान दिले आहे. या दोघींच्या मालकांनीही त्यांना जिंकून आणण्यासाठी काहीही करायची तयारी ठेवली आहे. सोमवार हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मांजरीला पुरस्कारासाठी ब्रिटन व रशियात ‘कॅटफाईट’
By admin | Published: April 25, 2017 12:44 AM