पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पीओकेमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात सातत्याने निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी आंदोलक संतप्त पाहायला मिळाले. येथील मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत आंदोलकांनी रस्ते रोको करत पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
पीओकेमधील जनता गेल्या सात दशकांपासून मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. सध्या जी आंदोलने होत आहेत, ती मुलभूत सुविधांचा विकास झाला नसल्याचा परिणाम आहे. यासोबतच येथील महागाई आणि भ्रष्टाचारामुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच लोक आता रस्त्यावर उतरून आपल्या हक्क मागत आहेत आणि सरकारचा निषेध करत आहेत.
दुसरीकडे, पीओकेमध्येही पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना गेल्या तीन महिन्यांपासून दररोज रस्त्यावर उतरावे लागत आहे. पीओकेमधील रहिवासी स्वातंत्र्याचा नारा देत आहेत. येथील लोक भारतासाठी बलिदान देण्याची शपथ घेत आहेत, पण पाकिस्तान सरकार लष्कर आणि पोलिसांच्या मदतीने पीओकेमधील लोकांचा आवाज दाबत आहे.
शाहबाजशरीफ यांच्या गाडीवर संतप्त जमावाचा हल्लायाचबरोबर, काश्मीरचा महामार्ग खुला करून आम्हाला भारतात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पीओकेमधील आंदोलक पाकिस्तान सरकारकडे करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानातील शहरांमध्ये वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या लोकांमुळे येथील नेत्यांना रस्त्यावर उतरणे कठीण झाले आहे. लाहोरमध्ये माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या गाडीवर संतप्त जमावाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पीओकेमधील लोक शाहबाज शरीफ यांच्या गाडीसमोर पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी शाहबाज शरीफ सुद्धा शांतपणे पाहत राहिले. शाहबाज शरीफ एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाहोरला पोहोचले होते, पण इथे ते मोठ्या संकटात सापडणार आहेत, याची त्यांना फारशी कल्पना नव्हती.