बीजिंग : चीनच्या जिझियांग व झियांगसू प्रांतांना चान होम नावाच्या जोरदार वादळाने जबरदस्त तडाखा दिला असून, या वादळामुळे ११.१लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, वादळग्रस्त भागातील विमान, रेल्वे, दळणवळण व फोन अशा सर्वच सुविधा ठप्प झाल्या आहेत. या वर्षी चीनला धडकणारे हे नववे वादळ असून, १९४९ नंतर आलेले हे सर्वांत मोठे वादळ आहे. या वादळामुळे जिझियांग प्रांताचे ४१० दशलक्ष डॉलरचे (२,५९० कोटी रुपयांचे) नुकसान झाले आहे. पुढे सरकल्यानंतर या वादळाचा वेग ओसरला असून, हवामान खात्याने इशाऱ्याची तीव्रता कमी केली आहे. हे वादळ दरताशी ३० कि.मी. वेगाने आता पिवळ्या समुद्रापर्यंत जाईल व त्याचा वेग हळूहळू कमी होत जाईल, असे सांगण्यात आले. जिझियांग प्रांतातील ७ लाख १० हजारपेक्षा जास्त लोकांना वादळाचा तडाखा बसला. (वृत्तसंस्था)
चान होम वादळात हजारो बेघर
By admin | Published: July 13, 2015 12:53 AM