भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर आता जगाच्या नजरा खिळल्या आहेत. काऊंटडाऊन सुरु झालेय, काही तास शिल्लक आहेत. सायंकाळी ६.०४ मिनिटांनी चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. यासाठी शेवटची १७ मिनिटे महत्वाची असणार आहेत. इस्त्रोच्या मदतीला नासा आणि इसा या अमेरिका, युरोपच्या अंतराळ संस्था आल्या आहेत. चंद्राची दुसरी बाजु जी कोणी कधीच पाहिली नाही ती जगासमोर उलगडली जाणार आहे. असे असताना ज्या पाकिस्तानी मंत्र्याने चंद्रयान २ च्या वेळेला भारताची खिल्ली उडविली होती, त्याच्यावर आता स्तुतीसुमने उधळण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन याने मंगळवारी इस्त्रोच्या चंद्रयान ३ ची स्तुती केली. हा मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांच्या राजवटीत पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. आता हेच फवाद पाकिस्तानी लोकांना चंद्रयान-3 च्या लँडिंगचे प्रसारण पाहण्याचे आणि दाखविण्याचे आवाहन करत आहेत. पाकिस्तानच्या मीडियाने लाइव्ह दाखवावे, असेही ते म्हणाले आहेत.
मानवजातीसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. विशेषतः भारतातील लोकांसाठी, वैज्ञानिकांसाठी आणि अवकाशाशी संबंधित लोकांसाठी असेल, असे ते म्हणाले.
२०१९ मध्ये काय म्हणालेले...फवाद यांनी चंद्रयान २ वेळी इस्त्रोच्या मोहिमेची खिल्ली उडविली होती. अज्ञात क्षेत्रात ९०० कोटी रुपये गुंतवणे शहाणपणाचे नाही, असे ते म्हणाले होते. तसेच मोहीम अयशस्वी झाली तेव्हा त्यांनी 'इंडिया फेल्ड' हा हॅशटॅग वापरला होता.
सहा महत्वाचे टप्पे...
- पहिला टप्पा: या टप्प्यात, चंद्रयानाचे पृष्ठभागापासूनचे 30 किमीचे अंतर 7.5 किमीपर्यंत कमी केले जाईल.
- दुसरा टप्पा: अंतर 6.8 किमी पर्यंत आणले जाईल. या टप्प्यापर्यंत, यानाचा वेग 350 मीटर प्रति सेकंद असेल, म्हणजेच सुरुवातीच्या तुलनेत साडेचार पट कमी केला जाणार आहे.
- तिसरा टप्पा: हे वाहन चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 800 मीटर उंचीवर आणले जाईल. येथून दोन थ्रस्टर इंजिन टेक ऑफ करतील. या टप्प्यात, यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या अगदी जवळ पोहोचेल.
- चौथा टप्पा: या टप्प्यात, यान पृष्ठभागाच्या 150 मीटर जवळ आणले जाईल. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात, म्हणजे व्हर्टिकल लँडिंग.
- पाचवा टप्पा: या चरणात ऑनबोर्ड सेन्सर्स आणि कॅमेर्यांचे थेट इनपुट आधीपासूनच संग्रहित संदर्भ डेटाशी जुळविण्यात येईल. या डेटामध्ये 3,900 छायाचित्रे समाविष्ट असतील. यानंतरच थेट लँडिंग केल्यास लँडिंग यशस्वी होईल की नाही हे ठरवले जाईल. लँडिंग साइट अनुकूल नाही असे वाटल्यास, ते थोडेसे आजुबाजुला वळविले जाईल. या टप्प्यात, यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या 60 मीटर एवढ्या जवळ आणले जाईल.
- सहावा टप्पा: लँडिंगचा हा शेवटचा टप्पा आहे, ज्यामध्ये लँडर थेट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल.