वाॅशिंग्टन : चॅटजीपीटीची एक वर्षापूर्वी निर्मिती करणाऱ्या ओपन एआय या कंपनीने सीईओ सॅम ऑल्टमन यांना त्या पदावरून दूर केले आहे. मायक्रोसॉफ्टशी संलग्न ओपन एआय कंपनीने घेतलेला हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. ऑल्टमन यांना हटविल्यानंतर या कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती यांची हंगामी सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ओपन एआय कंपनीच्या संचालक मंडळाने म्हटले की, सॅम ऑल्टमन हे कंपनीच्या संचालक मंडळाशी योग्यसंवाद साधत नव्हते. जबाबदाऱ्या पार पाडण्यात त्यांच्याकडून कुचराई होत होती. सॅम ऑल्टमन (वय वर्षे ३८) यांनी वर्षभरापूर्वी चॅटजीपीटीच्या निर्मितीची घोषणा केली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनविलेले चॅटजीपीटी हे सर्च इंजिन म्हणून वापरले जाते. तिथे विविध प्रकारच्या माहितीबद्दल विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळतात. चॅटजीपीटीची खास गोष्ट म्हणजे हा चॅटबॉट आपल्याशी टेक्स्ट फॉरमॅटमध्ये बोलतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची तपशीलवार लिखित उत्तरे देतो. या सगळ्या गोष्टींमागे मीरा मुराती यांची कल्पकता होती.
कोण आहेत मीरा? २०१८ साली टेस्ला कंपनीतील नोकरी सोडून मीरा ओपन एआय या कंपनीत रुजू झाल्या होत्या. चॅटजीपीटी तयार करण्यात त्यांनीदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मीरा मुराती यांचा जन्म १९८८ साली अल्बानियामध्ये झाला. मॉडेल एक्स टेस्ला कार तयार करण्यात मीरा यांचा सिंहाचा वाटा होता.
ॲमेझॉनने दिला भारतीयांना दणकाॲमेझॉनने आपली लोकप्रिय ‘व्हॉइस असिस्टंट’ सेवा ‘ॲलेक्सा’च्या संचालन विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) भर देण्याची कंपनीची योजना आहे. नोकर कपातीचा सर्वाधिक फटका अमेरिका, कॅनडा व भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे.