काही वर्षांपूर्वी चॅटजीपीटी या एआय टूलचा अविष्कार झाला आणि माहितीच्या मायाजालात एक नवा अध्याय सुरु झाला. अणू ऊर्जेचे देखील तसेच होते. ती मानवी कल्याणासाठी शोधण्यात आली, पण जगाने याचा ऊर्जेचा वापर बॉम्ब बनविण्यासाठी आणि शत्रूंना धाकात ठेवण्यासाठी केला. आज एवढे अण्वस्त्रे पृथ्वीवर आहेत, ज्यामुळे काही क्षणांत ही सृष्टी नष्ट होऊ शकते. चॅटजीपीटीचाही वापर आता वाईट कामांसाठी केला जाऊ लागला आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल या हॉटेलबाहेर टेस्लाच्या सायबर ट्रकमध्ये स्फोटके ठेवून तो उडवून देण्यात आला. हा स्फोट घडविणारा व्यक्ती अमेरिकेच्या सैन्यात होता. परंतू, त्याने सैन्याची टेक्निक न वापरता चॅटजीपीटीसह इतर एआय टूलचा वापर करत हा स्फोट केल्याचे समोर आले आहे.
लास वेगास पोलिसांनुसार ३७ वर्षांचा मॅथ्यू लिवेल्सबर्गर याचा मृत्यू झाला आहे. त्याने स्फोटापूर्वी गाडीत स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. याचवेळी गाडीतील स्फोटकांना पेट घेतला. ही टेक्निक त्याने एआयवरून मिळविली होती. पोलिस विभागाचे प्रमुख केविन मैकमैहिल यांनी या प्रकाराला गेम चेंजर असे संबोधले आहे.
अशाप्रकारची ही पहिली घटना आहे. एका व्यक्तीने चॅटजीपीटीचा वापर करून विशेष उपकरण तयार केले आणि त्याच्या मदतीने स्फोट घडविला, असे ते म्हणाले. यावर चॅटजीपीटीनेही सावध प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या उपकरणांच्या जबाबदारीने वापराबद्दल प्रतिबद्ध आहोत, धोकादायक सूचनांचे पालन न करण्यासाठी ती डिझाईन करण्यात आली आहेत. आम्ही तपासाला मदत करत आहोत, असे ओपनएआयने म्हटले आहे.
कसा केला वापर...लिवेल्सबर्गरने सायबर ट्रकमध्ये कॅनमध्ये रेसिंग ग्रेडचे इंधन भरले होते. या ट्रकमध्ये आधीच २७ किलो पायरोटेक्निक आणि ३२ किलो बर्डशॉट ठेवलेले होते. त्याने किती वेगाने गोळी चालविली तर ही स्फोटके पेट घेतली याची माहिती चॅटजीपीटीवरून घेतली होती. त्या वेगाने त्याने स्वत:वर गोळी मारून घेतली. या मुळे कारमधील स्फोटकांनी आग पकडली व पुढील घटना घडली. त्याने अमेरिकेत स्फोटके कशी हाताळता येतील याच्या नियमांचीही माहिती घेतली होती.