आमच्या प्राणांच्या बदल्यात भारताला स्वस्तात तेल; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची कठोर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:20 AM2022-12-08T08:20:50+5:302022-12-08T08:21:35+5:30

भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून आपल्या समस्या सोडवू पाहत आहे. रशियाच्या युद्धामुळे युक्रेनचे नागरिक रोज मरत आहेत.

Cheap oil to India in exchange for our lives; Harsh criticism of the Minister of Foreign Affairs of Ukraine | आमच्या प्राणांच्या बदल्यात भारताला स्वस्तात तेल; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची कठोर टीका

आमच्या प्राणांच्या बदल्यात भारताला स्वस्तात तेल; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची कठोर टीका

googlenewsNext

नवी दिल्ली - रशियाने आमच्या देशावर केलेल्या आक्रमणाचा गैरफायदा घेऊन भारत आपले तेलसाठे भरून घेत आहे. भारताची ही स्वस्त तेल खरेदी आमच्या प्राणांचे मोल देऊन केली जात आहे, अशी कठोर टीका युक्रेनचे परराष्ट्रमंत्री डिमत्रो कुलेबा यांनी केली आहे. 
युक्रेन युद्धानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनने ही टीका केली आहे. कुलेबा यांनी म्हटले की, युरोपकडे बोट दाखवणे सोपे आहे; पण युरोपीय देश तेल खरेदी करीत आहेत, म्हणून भारत तेल खरेदी करीत आहे, हे खरे कारण नाही. खरे कारण असे आहे की, भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून आपल्या समस्या सोडवू पाहत आहे. रशियाच्या युद्धामुळे युक्रेनचे नागरिक रोज मरत आहेत.

पैशाचा वापर नागरिकांना ठार करण्यासाठी
कुलेबा यांनी म्हटले की, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनचे नागरिक थंडीत हिटर्स, पाणी आणि वीज याशिवाय राहत आहेत. ज्यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी. तेलाच्या पैशाचा वापर रशिया युद्ध आणि युक्रेनच्या नागरिकांना ठार करण्यासाठी करीत आहे.

Web Title: Cheap oil to India in exchange for our lives; Harsh criticism of the Minister of Foreign Affairs of Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.