शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

बालपण देगा देवा... एका दिवसाच्या शाळेत जा; जपानमध्ये पर्यटकांना मिळते लहानपणाची अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 6:03 AM

टाेक्याे : आपल्या मराठीत एक म्हण आहे, बालपण देगा देवा... बालपण आणि शाळेतल्या आठवणीत रमून पुन्हा एकदा ते दिवस ...

टाेक्याे : आपल्या मराठीत एक म्हण आहे, बालपण देगा देवा... बालपण आणि शाळेतल्या आठवणीत रमून पुन्हा एकदा ते दिवस जगता यावे, असे प्रत्येकालाच वाटते. तर, शाळेतले दिवस अनुभवण्याची संधी जपानमध्ये मिळत आहे. पर्यटाकंसाठी एका कंपनीने एक याेजना सुरू केली आहे. ‘युअर हायस्कूल’, असे त्याचे नाव आहे. त्यात पर्यटकांना एका दिवसासाठी उच्च माध्यमिक शाळेत शिकण्याची संधी दिली जाते. शाळेतल्या दिवसांच्या आठवणींनी आजही अनेकांना गहिवरुन येते. अशीच अनुभूती पर्यटकांना मिळणार आहे. त्यासाठी चिबा प्रांतात एका बंद पडलेलया शाळेला नवे स्वरुप देण्यात आले आहे. 

शाळेत काय शिकवितात?nया विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवितात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, शाळेत विद्यार्थ्यांना अनेक गाेष्टी शिकविण्यात येतात. कदाचित त्या अनेकांना माहिती नसतील. nभूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत आत्मसंरक्षण कसे करावे, याचे धडे दिले जातात. nजपानचा पारंपरिक पाेषाख किमाेनाे परिधान करण्याची संधी पर्यटकांना मिळते.nजेवणानंतर इतिहास व पीटीचे वर्ग घेण्यात येतात. त्यात काही खेळ खेळविण्यात येतात.nस्वच्छतेचा धडा देण्यात येताे. जपानच्या विद्यार्थ्यांना हे आवर्जून शिकवण्यात येते. त्यामुळे पर्यटकांनाही हा धडा देण्यात येताे.

एका दिवसाच्या शाळेसाठी खर्च किती?  काेणत्याही वयाच्या पर्यटकाला ३० हजार येन म्हणजे सुमारे १७ हजार रुपये माेजून एका दिवसाचा विद्यार्थी बनता येईल. एका दिवसात ३० जणांना शाळेत प्रवेश देण्यात येताे. या शाळेत काही बदमाश विद्यार्थीही येतात, जे त्रासही देतात. 

गणवेश, शिक्षक आहेत खासविद्यार्थ्यांना आवडीनुसार नाविक किंवा सिस्टरचा गणवेश निवडता येताे. त्यांना विविध वर्गात बसविण्यात येते.विद्यार्थ्यांना याठिकाणी जपानी कॅलिग्राफीदेखील  शिकविण्यात येते. हे धडे इंग्रजीतून देण्यात येतात. येथील एक शिक्षक हिदेओ ओनिशिमा हे एकेकाळी गुन्हेगार हाेते. मात्र, गुरुंच्या भेटीनंतर ते शिक्षक बनले. 

टॅग्स :Japanजपान