लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात स्मार्ट, इंटरनेटशी जोडलेली खेळणी गेल्या दशकात झपाट्याने वाढली आहेत. असे असले तरी विशेषतः विकसनशील देशांमध्ये, मुले अजूनही बाहुल्यांसोबत खेळण्यास प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. स्टॅटिस्टा मार्केट इनसाइट्सच्या आकडेवारीनुसार, चीननंतर, भारत, अमेरिका, इंडोनेशिया इत्यादी प्रमुख देश आहेत, जिथे बालपण अजूनही बाहुल्या आणि इतर पारंपरिक खेळण्यांमध्ये घालवले जाते.
पारंपरिक खेळण्यांचे उज्ज्वल भविष्यब्रिक्स देशांव्यतिरिक्त जगातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये पारंपरिक खेळण्यांचा विभाग सातत्याने वाढत आहे. या वर्षी चीनला बाहुल्या आणि खेळण्यांच्या विक्रीतून १,०१४ अब्ज रुपये मिळतील, असा अंदाज आहे. पारंपरिक खेळण्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.
nचीनमधील या विभागातील खेळण्यांचा बाजार येत्या चार वर्षांत वार्षिक ७% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२७ पर्यंत, खेळण्यांचा बाजार ब्राझीलमध्ये ८.६% व भारतात ८% वाढ होईल, असा अंदाज आहे.
चीनमध्ये प्रौढांनाही आवडतात खेळणी nचीनमधील खेळण्यांचे सर्वात मोठे खरेदीदार हे १९८० ते २००० वर्षे वयातील आहेत. तिथे खेळण्यांची मागणी दुपटीने वाढली आहे. nप्रौढ देखील घर सजवण्यासाठी किंवा संग्रहासाठी खेळणी खरेदी करतात. भारतीय खेळण्यांची मागणी बाजारपेठेत सध्या प्रचंड वाढली आहे. २०१८-१९ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये खेळण्यांच्या निर्यातीत ६१% वाढ झाली आहे.