बूंदी : मुलांचे वेगवेगळी नावे तर तुम्ही खूप ऐकली असतील, पण अँड्राइड, सिम कार्ड अशी नावे ऐकली आहेत का? नसतील तर राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात असे अनेक नावे ऐकायला मिळतील. जिल्ह्यापासून दहा किमी अंतरावर असलेल्या रामनगर या गावात प्रवेश केल्यावर मुलांची विचित्र नावे ऐकायला मिळतील. येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचे नाव ‘कलेक्टर’ आहे, पण त्यांनी शाळेचे तोंडही बघितलेले नाही. येथील बहुतांश नागरिक अशिक्षित आहेत. येथील एका शिक्षकाने सांगितले की, अधिकाऱ्यांबाबत असलेल्या आकर्षणामुळेच येथील नागरिकांनी आपल्या मुलांची नावे आयजी, एसपी, हवालदार असे ठेवले आहेत. काही जणांनी आपल्या मुलांची नावे राष्ट्रपती, राज्यपाल, मिस कॉल अशी ठेवली आहेत.
मुलांचे नाव अँड्रॉइड, सिम कार्ड
By admin | Published: April 18, 2017 12:40 AM