क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वीज गेली, तरीही मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 06:05 AM2022-11-27T06:05:05+5:302022-11-27T06:05:26+5:30
क्षेपणास्त्र हल्ल्यानेही राेखले नाही उपचार
कीव्ह : रशियाने केलेल्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये नागरिकांचे हाल हाेत आहेत. आराेग्य सुविधांवर माेठा परिणाम झाला आहे. याकडे लक्ष वेधणारी एक घटना समाेर आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही युक्रेनच्या डाॅक्टरांनी आपत्कालीन दिव्यांच्या प्रकाशात एका मुलावर हृदयाची शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचविला.
रशियाने दाेन दिवसांपूर्वी कीव्ह शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर कीव्ह हार्ट इंस्टिट्यूटचा वीज पुरवठा बंद झाला. त्यावेळी डाॅक्टर्स एका मुलावर हृदयाची शस्त्रक्रिया करीत हाेते. मात्र, अशा संकटसमयीदेखील आपत्कालीन दिव्यांचा वापर करुन शस्त्रक्रिया पूर्ण केली.
काय म्हणाले डाॅक्टर्स?
शस्त्रक्रियेचा व्हिडीओ रेकाॅर्ड करणारे डाॅक्टर्स म्हणतात, अचानक वीज गेली. आम्ही शस्त्रक्रिया थांबवू शकत नव्हताे. मात्र, अंधारातही आम्ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. रशियाला हेच हवे आहे.
युद्धातही डाॅक्टर्स शांत आणि संयमी
nसुमारे एक काेटी नागरिकांना विजेविना कडाक्याच्या किंवा अक्षरश: हाडे गाेठविणाऱ्या थंडीत राहावे लागत आहे. परंतु, दुसरे संकट म्हणजे वीजपुरवठा खंडित हाेत असल्यामुळे तेथील आराेग्य सेवेवरही माेठा परिणाम झाला आहे.
nयाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साेशल मीडियावर डाॅक्टरांचे काैतुक करण्यात येत आहे.
nयुद्धातही डाॅक्टर शांत आणि संयमी असून, कठीण परिस्थितीतही ते लाेकांवर उपचार करीत आहेत.