चीनमधील शास्त्रज्ञांनी हल्लीच देशातील तेल समृद्ध क्षेत्र असलेल्या झिंजियांगमध्ये जमिनीच्या पोटात तब्बल दहा हजार मीटर खोल होल मारण्यास सुरुवात केली आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले की, मंगळवारी झिंजियांगमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बोअरहोल खोदण्यासाठी ड्रिलिंग सुरू केलं आहे. त्यापूर्वी चीनने गोबी वाळवंटात आपली पहिली सार्वजनिक अंतराळ मोहीम सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या आत हा विस्तीर्ण शाफ्ट १० पेक्षा अधिक खंडीय स्तर किंवा खडकांच्या स्तरांमध्ये घुसणार आहे. हा शाफ्ट पृथ्वीच्या १४५ दशलक्ष वर्षे जुन्या क्रेटेशियस सिस्टिमपर्यंत पोहोचण्याची क्षमता बाळगतो. तर चायनिज अँकँडमी इंजिनिअरिंगचे एक शास्त्रज्ञ सन जिनशेंग यांनी शिन्हुआला सांगितले की, या ड्रिलिंग प्रोजेक्टची निर्मिती काठिण्याच्या तुलनेत दोन पातळ स्टीलच्या तारांवर चालणाऱ्या मोठ्या ट्रकच्या मदतीने करता येऊ शकते.
२०२१ मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पोटात शोध घेण्याचं आवाहन केलं होतं. या शोधातून प्राप्त डाटाचा वापर प्रामुख्याने खनिज आणि उर्जा संसाधनांची ओळख करण्यासाठी आणि भूकंप आणि ज्वालामुखीच्या स्फोटांसारख्या पर्यावरणीय संकटांच्या जोखमीचं आकलन करण्यामध्ये केला जातो.
तर चीनचं बोअरवेलचं काम जर यशस्वी झालं तर हा पृथ्वीवरील दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित होल ठरणार आहे. पहिला होल हा रशियामध्ये कोला सुपरडुपर बोअर होल आहे. तो २० वर्षांच्या ड्रिलिंगनंतर १९८९ मध्ये १२ हजार २६२ मीटर पर्यंत पोहोचला होता.