बीजिंग – अमेरिकेसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला केल्याचा व्हिडीओ जारी केला आहे. गुआमवरील हल्ल्याचा बनावट व्हिडिओ चीनने प्रसिद्ध केला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सने या हल्ल्यात एच -६ अणुबॉम्बचा वापर केला आहे. चिनी सैन्याने या हल्ल्याचा एक बनावट व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये एच -६ बॉम्बर अमेरिकन अँडरसन एअर फोर्स बेसवर बॉम्ब टाकताना दिसत आहे.
चीनचा गुआममध्ये एच -६ बॉम्बरने हल्ला
पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या वीबो अकाऊंटवर शनिवारी व्हिडिओ अपलोड करण्यात आला. चीनी वायुसेनेचा हा दोन मिनिटे आणि १५ सेंकदाचा व्हिडिओ हॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरसारखा दिसत आहे. ज्यामध्ये चीनचा एच -६ बॉम्बर वाळवंटासारख्या कोणत्या हवाई दलाच्या तळावरून उडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे म्हटलं आहे की गॉड ऑफ वॉर एच -६ हल्ला करण्यासाठी जात आहे.
अमेरिकन एअरफोर्सवर चीनचा बॉम्ब वर्षाव
या व्हिडिओमध्ये पुढे असे दिसते आहे की, चिनी हवाई दलाच्या पायलटने आकाशात एक बटण दाबले आणि हे क्षेपणास्त्र समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेल्या धावपट्टीवर पडून फुटले. जशी ही मिसाईल रनवेवर आदळते तिथे एका सॅटेलाईट इमेजचं चित्र दिसतं. ज्यामध्ये ही धावपट्टी अमेरिकन नेव्हल बेस गुआमच्या अँडरसन नेवल बेससारखी दिसते. या व्हिडिओमध्ये चिनी एअरफोर्सने विविध प्रकारचे संगीतही वापरले आहे. याबाबत नवभारत टाइम्सनं बातमी केली आहे
चीन आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
PLAAF ने व्हिडिओ जारी करुन कॅप्शनमध्ये लिहिलं की, आम्ही मातृभूमीच्या हवाई सुरक्षेचे रक्षक आहोत. आमच्याकडे मातृभूमीच्या आकाशाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता नेहमीच आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर आतापर्यंत चीनच्या संरक्षण मंत्रालयाने किंवा अमेरिकन इंडो-पॅसिफिक कमांडने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
त्यामुळेच चीनने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे
सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स अँण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज येथील रिसर्च फेलो कोलिन कोह म्हणाले की, चीनने एका विशिष्ट हेतूने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. चीनने त्यांची मारक क्षमता अनेक दूरपर्यंत असल्याचं दाखवण्यासाठीच हा व्हिडीओ रिलीज केला. या व्हिडिओद्वारे चीनने अमेरिकेला तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील वादांपासून दूर राहण्याचा इशारा देखील दिला आहे.
प्रशांत महासागरात गुआम येथे अमेरिकेचा मोठा सैन्य तळ
प्रशांत महासागरातील गुआम नेव्हल बेस हा अमेरिकेचा चीननजीक सर्वात मोठा सैन्य तळ आहे. या नौदल तळाच्या मदतीनं अमेरिका चीनसह उत्तर कोरियाच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहे. अलिकडच्या दिवसांत चीनबरोबर वाढत्या तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेने गुआम नेव्हल बेसमध्ये सैन्य दलासह अनेक आधुनिक विमाने तैनात केली आहेत. इथून काही मिनिटांतच अमेरिकन बॉम्बर दक्षिण चीन समुद्रात अनेक चिनी सैन्य तळांवर हल्ला करु शकतो.
चीनने हा बॉम्बर भारत सीमेवर तैनात केलाय
लडाखमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने हा बॉम्बर होटान एअरबेसवरही तैनात केले आहे. चीनने अशी भीती व्यक्त केली आहे की जर भारताशी युद्ध झाले तर उंचीमुळे त्याचे फ्रंटलाइन लढाऊ विमान जास्त प्रभावी ठरणार नाहीत. अशा परिस्थितीत भारतावर स्ट्रेटजिक बॉम्बरने हल्ला करावा लागेल. त्यामुळे चीनने भारताच्या सीमेवर हे बॉम्ब मोठ्या संख्येने तैनात केले आहेत.