शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

'सेला टनल'च्या बांधकामामुळे चीनचा संताप; पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्याने झाला तीळपापड!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 4:58 PM

मोदींच्या दौऱ्यामुळे सीमावादाचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल असा चीनचा इशारा

PM Modi Arunachal Visit, India vs China: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल दौऱ्यानंतर चीनचा तीळपापड झाल्याची माहिती आहे. त्यांना इतका राग आला की त्यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत भारताकडे राजकीय निषेध नोंदवला. अरुणाचल प्रदेशवरचीन आपला हक्क सांगत आहे. चीनने म्हटले आहे की, भारताच्या या गोष्टीमुळे सीमावाद आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.

'सेला टनल' गेम चेंजर ठरेल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये १३ हजार फूट उंचीवर बांधलेल्या सेला बोगद्याचे उद्घाटन केले. अरुणाचल प्रदेशातील रणनीति दृष्ट्या महत्त्वाच्या तवांगमध्ये हवामान कनेक्टिव्हिटी असलेला हा बोगदा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैनिक फार कमी वेळात चीनच्या सीमेवर पोहोचू शकतील. सेला बोगदा आसाम ते अरुणाचल प्रदेशातील तेजपूर ते पश्चिम कामेंग या रस्त्यावर बांधण्यात आला आहे. ते बांधण्यासाठी ८२५ कोटी रुपये खर्च आला आहे. इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब दोन लेन बोगदा आहे. सेला बोगद्याद्वारे चीनजवळील सीमावर्ती भागात सैनिक आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक सुलभ होणार आहे.

चीनची तीळपापड का?

अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन करतो आणि जेव्हा जेव्हा भारतीय नेते अरुणाचल प्रदेशला भेट देतात, तेव्हा ते आपला दावा सांगण्यासाठी निषेध नोंदवतात. चीनने या भागाला झांगनान असे नाव दिले आहे. अरुणाचल प्रदेशावरील चीनच्या पोकळ दाव्याचे भारताने सातत्याने खंडन केले आहे आणि तो आपला अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे. भारतानेही चीनच्या या निर्णयाला विरोध केला होता, ज्यात त्याने भारतीय क्षेत्रांची नावे ठेवली होती. चीनचे हे पाऊल वास्तव बदलणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले होते.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग