बिजिंग : कोरोना व्हायरसच्या संकटात सध्या 'व्हायरस पासपोर्ट'ची बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, चीनने आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हेल्थ सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू केला आहे. चीन असे करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. म्हणजेच, देशात आणि देशाबाहेर जाणाऱ्यांजवळ आता डिजिटल सर्टिफिकेट असणार आहे, जे युजर्सच्या लसीची स्थिती आणि चाचणीचा रिपोर्ट सांगणार आहे. जगातील इतर अनेक देश देखील या सर्टिफिकेटचा विचार करीत आहेत. (china becomes first country to launch covid-19 virus passport for international travellers)
हे सर्टिफिकेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीचॅटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. सोमवारी सरकारने याची सुरुवात केली आहे. मात्र, हे सर्टिफिकेट केवळ चीनी नागरिकांना उपलब्ध असेल. सध्या हे अनिवार्य केले नाही. डिजिटल स्वरुपाशिवाय हे सर्टिफिकेटही कागदाच्या स्वरूपात असेल. याला जगातील पहिला व्हायरस पासपोर्ट म्हटले जात आहे.
दुसऱ्या देशांमधील परिस्थितीअमेरिका आणि ब्रिटन अशा देशांमध्ये आहेत, जे सध्या अशा परवान्याची अंमलबजावणी करण्याचा विचार करीत आहेत. युरोपियन संघ देखील 'ग्रीन पास' या लसीवर काम करत आहे. या माध्यमातून नागरिक संघाचे सदस्य देशात व इतर परदेशी देशात जाऊ शकतील. वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, चीनमध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमात एक क्यूआर (QR) कोड असेल, जो सर्व देशांना प्रवाशांना आरोग्याविषयी माहिती देईल. चीनमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घरगुती पासपोर्टसाठी वीचॅट आणि इतर चिनी स्मार्टफोन अॅप्समध्ये उपस्थित असलेला क्यूआर कोड आवश्यक आहे.
चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्यावर्ल्डोमीटरच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, चीनमध्ये आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील ८५ हजार २०१ बाधित रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. अमेरिका अजूनही जगात सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. आतापर्यंत ११ कोटी ८६ लाख ३८ हजार १११ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.