लोकमत न्यूज नेटवर्क : दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक शिरजोर होत असलेला चीन आता दक्षिण चीन समुद्रात वाटमारी करू पहात आहे. दक्षिण चीन समुद्री मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजाची तपशीलवार माहिती देण्याचा दंडक चीनने घातला आहे. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला असून सर्वच देशांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
वाद काय?n या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. n कायद्याचे उल्लंघन केल्यास चीनकडून कोणती कारवाई केली जाईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यातून संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दक्षिण चीन समुद्राचे महत्त्वn या समुद्री परिसरातून दरवर्षी २८६ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो.n जगभरातून होणाऱ्या सागरी व्यापाराच्या एक तृतियांश हिस्सा या भागातला आहे.
काय आहे चीनचा कायदा?आपल्या हद्दीतील समुद्राच्या सुरक्षेचे कारण पुढे करत चीनने १ सप्टेंबरपासून नवीन कायदा लागू केला आहे. त्यानुसार दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना आपल्याकडील मालाची तसेच वेग, कोणत्या दिशेने जहाज जाणार आहे ते इत्यादी सर्व बारिकसारिक माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याचे अधिकार हा कायदा चिनी अधिकाऱ्यांना देतो.चीनचा हा कायदा युद्धसामुग्री घेऊन जाणाऱ्या तसेच तेल, नैसर्गिक वायू आणि रसायने इत्यादींची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर लागू असेल.
भारतासाठी महत्त्वाचा सागरी मार्गभारताचा ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो. त्यापैकी ५५ टक्के व्यापार दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून होतो. या मार्गावरून भारताचाही १३ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो. जूट, चहा, पोलाद, तांबे व चामडे इत्यादी वस्तूंची निर्यात या मार्गाने केली जाते.