बीजिंग : भारतासोबतचा सीमावाद सोडवण्याच्या गप्पा चीन करीत असला तरी तो भारताला लागून असलेल्या सीमेवर स्वत: शक्तिशाली व्हायच्या प्रयत्नांत आहे. ताज्या माहितीनुसार चीन भारताला खेटून असलेल्या तिबेट आणि शिनजियांग प्रांतात जवळपास ३० विमानतळे उभारत आहे. त्यातील काही तयार झाले असून काहींचे काम सुरू आहे. ही ठिकाणे चीनसाठी दूर असली तरी भारताला अगदी खेटून आहेत.
तिबेटमध्ये चीन खूप वेगाने बांधकामात व्यस्त आहे. नुकतेच त्याने एक हाय स्पीड बुलेट ट्रेनची सुरुवात केली होती. ही रेल्वे तिबेटची राजधानी ल्हासाला न्यिंग-चीशी जोडणारी आहे. न्यिंग-ची तिबेटचे एक शहर असून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ आहे. अरुणाचल प्रदेशचा काही भूभाग आमचा असल्याचा चीनचा दावा आहे. चीनने या भागांत सातत्याने रेल्वे, रस्ते आणि विमान प्रवासाच्या पायाभूत सुविधा वाढवत आहे. त्यामुळे लष्करी जवानांसोबत सामान आणि शस्त्रे लवकर सीमेवर पोहोचवली जाऊ शकतील.
विमान मार्ग खुले
n तिबेट आणि शिनजियांग प्रांतासाठी चीनने २३ विमान मार्गही खुले केले आहेत. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांना तिबेट आणि शिनजियांगहून आणता येईल आणि तेथे घेऊन जाता येईल. n याची सुरुवात १ सप्टेंबर रोजी झाली. तेव्हा ११५ वरिष्ठ अधिकारी एका चार्टर्ड फ्लाइटने शिगात्से हेपिंग एअरपोर्टहून (तिबेट) चेंगदू, सिचुआन प्रांतात पोहोचले होते. चिनी भाषेची सक्तीn तिबेटचा ताबा घेतल्यापासून चीन त्याला पूर्णपणे आपला रंग देऊ इच्छित आहे. n गेल्या महिन्यात चीनने तिबेटमध्ये चीनची भाषा व प्रतीके लादण्यावर जोर दिला, असे वृत्त आहे.