बीजिंग- चिनी ड्रॅगनने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या नावाखाली पाकिस्तानात पूर्ण घुसखोरी केली असून आपल्या नागरिकांसाठी चीन पाकिस्तानात घरे बांधत आहे. पाकिस्तानमध्ये चीनचे 5 लाख कर्मचारी राहाणार असून त्यांच्यासाठी 15 दशलक्ष डॉलर्स खर्च करून या घराचे बांधकाम केले जात आहे.चीन पाकिस्तान गुंतवणूक मंडळाने पाकिस्तानात 36 लाख चौरसफुटाचा भूखंड विकत घेतला असून 2022 पर्यंत चिनी नागरिकांसाठी तेथे घरे बांधण्यात येणार आहेत. हे सगळे लोक पाकिस्तानच्या ग्वादर बंदरासाठी काम करणार आहेत. पाकिस्तानचे ग्वादर बंदर बांधण्यासाठी, त्याच्या विकासासाठी व पुढील व्यापारासाठी पाकिस्तान व चीन यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या कोसळण्य़ाच्या बेतात आहे. परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत असून कर्जाचा डोंगरही पाकिस्तानवर आहे. यामुळे पाकिस्तान सध्या वारंवार चीनकडे हात पसरतो आणि कर्जाची मागणी करतो. चीननेही पाकिस्तानला वारंवार मदत देऊ केली आहे. आता विकासप्रकल्पाच्या नावाखाली चीनने आपल्या पाच लाख नागरिकांना पाकिस्तानात घुसवण्याचे निश्चित केले आहेच, त्याहून त्यांच्या घरांचे बांधकामही सुरु केले आहे.
स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, कर्जासाठी पुन्हा हात पसरावे लागणारचीनने यापूर्वी मध्य आशियातील देशांमध्ये आणि आफ्रिकन देशांमध्ये आपल्या नागरिकांसाठी अशा वसाहती बांधल्या आहेत. चीनने पाकिस्तानात रेल्वे, महामार्ग आणि पाइपलाइन प्रकल्पासांठी गुंतवणूक केलेली आहे. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर योजनेत 39 प्रकल्पांचा समावेश असून त्यातील 19 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. चीनने 2015 पासून या प्रकल्पांवर 18.5 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.
'या' देशातील लोकांचे वजन का कमी होत आहे?
सीपीइसी हा चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हचा एक भाग असून आशियातील विविध देशांमध्ये आपला प्रभाव वाढीस लागावा यासाठी चीन प्रयत्न करत आहेत. भूतान आणि भारत वगळता दक्षिण आशियातील सर्व देशांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे भारताने या प्रकल्पास विरोध केला आहे. यामुळे आमच्या देशाच्या सर्वभौमत्वाला धक्का पोहोचतो असे मत भारतातर्फे व्यक्त करण्यात आले होते.