शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

अमेरिकेला चीन अवघ्या 20 मिनिटांत उद्ध्वस्त करू शकतो; आज मिसाईलचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 9:43 AM

चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे.

बिजिंग : चीनमध्ये आज राष्ट्रीय दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्त चीन ताकदीचे प्रदर्शन करणार आहे. रस्त्यांवर 15 हजार जवान आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रात्रांचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये असेही एक मिसाईल आहे जे अमेरिकेच्या उरात धडकी भरवू शकते. चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याशिवाय अन्य काही शस्त्रास्त्रे आहेत जी याआधी दाखविण्यात आली नव्हती. 

Dongfeng-17 एक लघू मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे जे हाइपरसोनिक ग्‍लाइड व्हेईकल लाँच करू शकते. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने अंतर कापते. एवढेच नाही तर हे मिसाईल अमेरिकेच्या सुरक्षा प्रणाली शिल्ड मिसाईलला भेदण्याची क्षमता ठेवते. उड्डान करताना हे मिसाईल त्याच्या लक्ष्यानुसार उंची कमी किंवा जास्त करू शकते. याशिवाय हे मिसाईल आण्विक हत्यारांशिवाय कव्हेंशन वायरहेड नेण्यासही सक्षम आहे. 2017 मध्ये या मिसाईलची चाचणी झाली होती. या मिसाईलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊन पुन्हा कक्षेत येण्याचा विक्रम केला होता. 

DF-41आंतरखंडीय मिसाईलया मिसाईलचे पूर्ण नाव Dongfeng-41 आहे. ही आयसीबीएम मिसाईल पहिल्यांदाच परेडमध्ये भाग घेणार आहे. ही मिसाईल 10 मॅकच्या वेगाने उड्डाण करते. या मिसाईलची रेंज 7500 मैल असून जगातील कोणत्याही भागात काही मिनिटांत हल्ला चढवू शकते. या मिसाईलमुळे चीन अमेरिकेवर केवळ 20 मिनिटांत हल्ला करू शकते. महत्वाचे म्हणजे एका वेळी ही मिसाईल 10 लक्ष्यांचा भेद करण्यास सक्षम आहे. तसेच अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. अमेरिका आणि रशियाकडेही अशा प्रकारची मिसाईल आहे. तसेच रडारलाही ही मिसाईल सापडत नाही. या मिसाईलमुळे चीनला वेगवेगळ्या ठिकाणी मिसाईल तैनात करण्यापासून मुक्ती मिळाली आहे. 

H-6N बॉम्बवर्षाव करणारे विमानहे विमान दिसायला साध्या प्रवासी विमानासारखे आहे. मात्र, या विमानातून लांबच्या ठिकाणी बॉम्बवर्षाव करता येतो. नॅशनल डे परेडच्या रिहर्सलवेळी हे विमान दिसले आहे. सहा विमानांनी आकाशात कसरती केल्या होत्या. या वेळी या विमानांना KD-20/CJ-10K आणि  KD-63 क्रूझ मिसाईल लावलेली होती. हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरू शकते. 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाrussiaरशिया