China Corona Updates: चीनमध्ये कोरोनाची 'त्सुनामी' येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रूग्णांना दाखल करण्यासाठी रूग्णालयात जागा नाही. अंत्यविधीसाठीही तासन्तास वाट पाहावी लागते. महामारीतज्ञांचा असाही अंदाज आहे की, चीनची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कोरोनाला बळी पडू शकते. संसर्गाच्या वाढत्या वेगाने, विशेषज्ञांनी केलेले भाकीत आणखीनच भयावह दिसत आहेत. तीन दिवसांपूर्वी ब्लूमबर्गने आपल्या अहवालात सांगितले आहे की या आठवड्यात चीनमध्ये एका दिवसात कोरोनाचे 37 दशलक्ष प्रकरणे समोर येऊ शकतात. हा आकडा आतापर्यंतचा उच्चांक असेल.
90 कोटी लोकांना लागण होणारसाऊथ चायना मॉर्निंग पोस्टने लीक झालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत म्हटले की, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचा असा विश्वास आहे की 1 ते 20 डिसेंबर दरम्यान देशात सुमारे 250 मिलियन लोकांना संसर्ग झाला आहे. म्हणजेच अवघ्या 20 दिवसांत देशातील सुमारे 18 टक्के लोकसंख्या संसर्गाच्या विळख्यात आली आहे. एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फिगेल डिंग यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के आणि जगातील 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुढील तीन महिन्यांत चीनमधील सुमारे 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण होईल. या काळात लाखो लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.
चिनी शहरांमध्ये दररोज लाखो प्रकरणेडिसेंबरच्या सुरुवातीलाच चीन सरकारने झिरो-कोविड पॉलिसी काढून टाकली होती. तेव्हापासून संसर्ग झपाट्याने वाढत आहे. चीनने आता कोविड प्रकरणांची नोंद न ठेवण्याचे सांगितले आहे. परंतु चीनचे आरोग्य अधिकारी हे मान्य करत आहेत की शहरांमध्ये दररोज लाखो संक्रमित समोर येत आहेत. रविवारी शांघायपासून थोड्याच अंतरावर असलेल्या झेजियांग शहरात दहा लाखांहून अधिक रुग्ण दिसू लागले आहेत. हा आकडा काही दिवसांत दुप्पट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजे एका दिवसात 20-20 लाख केसेस.
डॉक्टरही आजारी पडताहेतकोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने चीनची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रूग्णांना दाखल करण्यासाठी रूग्णालयात जागा नाही. वृत्तसंस्थेनुसार, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांशी संबंधित लोकांनाही कोरोनाची लागण होत आहे आणि तरीही ते रुग्णांवर उपचार करत आहेत. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शनिवारी आपल्या अहवालात सांगितले होते की, बीजिंगमधील रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड भरले आहेत. शवागार आणि स्मशानभूमीच्या बाहेर रांगा आहेत. मात्र, त्यानंतरही सरकारने बीजिंगमध्ये केवळ 7 मृत्यू स्वीकारले आहेत. रुग्णालयांमध्ये भरणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आता डॉक्टरांना ऑनलाइन कोरोना रुग्णांचा सल्ला घेण्याची आणि औषधे लिहून देण्याची परवानगी दिली आहे. त्याला स्थानिक भाषेत 'इंटरनेट हॉस्पिटल' असे संबोधले जात आहे.