बीजिंग - चीनमध्येकोरोना नावाच्या एका व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 400 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त लोक या आजाराने ग्रस्त होत असल्याने चीन सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्हायरसमुळे माणसाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. काही डॉक्टरांनाही याची लागण झाल्याची माहिती चीनमधील वृत्तपत्रांनी दिली आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या व्हायरसवर कंट्रोल मिळवण्याचे आदेश दिले आहेत. व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. शी जिनपिंग यांनी 'वुहान आणि इतर ठिकाणांवर नुकत्याच झालेल्या नवीन कोरोना व्हायरस न्यूमोनियाची दखल गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. सर्व सरकारी कार्यालये, दवाखाने संबंधित विभागांनी लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्राधान्य द्यायला हवं' असं म्हटलं आहे. लॉस एन्जेलिस टाइम्सच्या वृत्तानूसार, चीननंतर हा घातक व्हायरसने थायलॅंड आणि जपानमध्येही आपले पाय पसरले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, हा व्हायरस वेगाने पसरत आहे आणि अनेकांचा जीव गेला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनसोबतच भारत सरकारनेही कोरोना व्हायरसबाबत दुजोरा दिला आहे. भारतात हा व्हायरस पसरू नये यासाठी एअरपोर्टवर प्रवाशांची मेडिकल टेस्ट केली जात आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, Severe acute respiratory syndrome किंवा SARS निमोनियाचं घातक रूप आहे. थायलँड आणि जपानमध्येही कोरोन वायरसची तीन प्रकरणे पुढे आली आहेत. साउथ कोरियामध्येही या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 35 वर्षाची चीनी महिला वुहानमधून सियोलला आली होती. अमेरिकेतील विमानतळावरही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
सी-फूड ठरू शकतं कारण
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोना व्हायरस सी-फूडसंबंधी एक आजार आहे. हा आजार चीनमध्ये सी-फूड बाजारातून पसरला आहे. हा व्हायरस उंट, मांजर, वटवाघूळसहीत अनेक प्राण्यांमध्ये पसरल्यानंतर मनुष्यांमध्ये वेगाने पसरतो.
या व्हायरसची लक्षणे निमोनियासारखीच आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णाला सर्वातआधी श्वास घेण्याची समस्या होते. त्यासोबतच आणखीही काही लक्षणे बघायला मिळतात. जसे की, घशात वेदना किंवा जळजळ होणे, सर्दी, खोकला, ताप आणि किडनीशी संबंधित समस्याही होऊ शकतात.
कोरोना व्हायरसवर उपचार
सध्या तरी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी कोणत्याही प्रकारचं वॅक्सीन उपलब्ध नाही. या व्हायरसने पीडित लोकांवर इतर औषधांच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. वैज्ञानिक या व्हायरसला नष्ट करण्यासाठी वॅक्सीन आणि उपचारावर काम करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
MNS Mahadhiveshan Live: थोड्याच वेळात मनसेच्या नवीन झेंड्याचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण होणार
राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा
निर्भयाच्या दोषींच्या सुरक्षेवर दररोज 50 हजारांचा खर्च
गंगेसाठी ३९ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या भारतीय ‘ग्रेटा’कडे दुर्लक्ष!