बीजिंग - कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1011 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) एका दिवसात कोरोनामुळे तब्बल 103 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनो व्हायरसमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित केलेला आहे.
हुबई हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (10 फेब्रुवारी) आणखी 2097 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तसेच तब्बल 103 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव हा चीनच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. अवघ्या 15 सेकंदात एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चीन सरकार २०,००० कोरोनाग्रस्तांना मारणार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील एका 56 वर्षीय व्यक्तीला 15 सेकंदात कोरोनाची लागण झाली. बाजारामध्ये फक्त 15 सेकंदासाठी महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या भीषण धोक्याबद्दल इशारा देणाऱ्या पहिल्या आठ डॉक्टरांपैकी डॉ. ली वेनलिआंग यांचा याच विषाणूने गुरुवारी बळी घेतला होता. या डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश चीन सरकारने दिले आहेत. ही चौकशी करण्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने एक उच्चस्तरीय चौकशी समिती तातडीने वुहान शहरात पाठविली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोदीसाहेब! माझ्या मुलाला वाचवा, जपानमध्ये अडकलेल्या लेकासाठी बापाची आर्त हाक
चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसचं संकट मोठ्या प्रमाणात पसरत असून हजारो लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला पत्र लिहून भारत चीनची मदत करेल असं सांगितलं. यावर चीनने भारताचं कौतुक करत तुम्ही करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या पत्रामुळे चीनशी असलेल्या भारताच्या मैत्रीचे प्रतिबिंब उमटले असं सांगितले आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव असताना यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला लिहिलेलं पत्र महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, कोरोना विषाणूविरूद्ध चीनसोबत लढा देण्यास भारताच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माध्यमाशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींकडून आलेल्या पत्राचा उल्लेख केला. भारताच्या सद्भावनाचे हे पाऊल चीनशी असलेल्या त्याच्या मैत्रीचे प्रदर्शन करतो असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results Live: दिल्लीत आपची हॅट्ट्रिक; 57 जागांवर आघाडी, भाजपा 13 मतदारसंघांत पुढे
Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास
Delhi Election Result 2020 : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?