शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

China Coronavirus : भारताने रोखला चीनमधून येणाऱ्यांचा ई-व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 7:47 PM

चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं आहे.

ठळक मुद्देभारताने चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा तात्पूरती थांबवल्याची माहिती मिळत आहे.जगभरात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर तात्पूरती बंदी घातली.

बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 259  जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9000 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्येकोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं आहे. भारताने चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा तात्पूरती थांबवल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

भारतीय दूतावासाने ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर तात्पूरती बंदी घातली आहे. 'सध्याच्या घडामोडींमुळे ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर  बंदी घालण्यात आली आहे. चीनचे पासपोर्टधारक आणि चीनमध्ये राहणारे अन्य देशाचे नागरिक यांना ही बंदी लागू असणार आहे. ज्यांना यापूर्वीच ई-व्हिसा मिळाला आहे, त्यांचा ई-व्हिसा वैध नसेल असं दूतावासाने जाहीर केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'ज्यांना काही महत्त्वाच्या कारणासाठी भारतात यायचे आहे ते बीजिंगमधील भारतीय दूतावासाशी किंवा शांघाय किंवा गुआनझोऊ येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी तसेच या शहरांमधील भारतीय व्हिसा अ‍ॅप्लिकेशन केंद्रांशी संपर्क साधू शकतील' असं देखील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. एअर इंडियाच्या एका विमानातून चीनच्या वुहानमधून 324 भारतीयांना घेऊन एक विमान शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. वुहानमधून आणलेल्या भारतीयांत 3 अल्पवयीन, 211 विद्यार्थी आणि 110 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जगभरात कोरोनामुळे घबराट पसरली आहे. चीनमध्ये आतापर्यंत यामुळे अनेकांचा मृत्यू झाल आहे. मात्र आता चीनच्या बाहेरही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अन्य देशांतही कोरोनाची लागण झाल्याने जागतिक आणीबाणी जाहीर करीत आहोत. आरोग्यसुविधा नसलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजू शकतो, हा चिंतेचा विषय आहे. जागतिक आणीबाणी जाहीर केल्याने कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक मदत व साधनसामग्री मिळू शकते. मात्र, विषाणूचा फैलाव झालेल्या देशांत नागरिकांना पाठविण्यास व व्यापारावर नियंत्रणे येतील. चीनच्या काही शहरांत जाणारी विमानसेवा अनेक कंपन्यांनी स्थगित केली आहे. मॅकडोनाल्ड, स्टारबक्स यांनी चीनमधील दुकाने बंद ठेवली आहेत.

भारतात केरळमध्ये पहिला रुग्ण समोर आला आहे. वृत्त एजन्सी शिन्हुआनुसार 1,36, 987 अशा लोकांची ओळख पटली आहे, जे कोरोनाने पीडित लोकांच्या संपर्कात आले होते. ज्या प्रवाशांनी गेल्या दोन आठवड्यांत चीनचा प्रवास केला होता, अशा प्रवाशांच्या प्रवेशास अमेरिकेने अस्थायी बंदी आणली आहे. मानव सेवा विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी सांगितले की, अमेरिकी नागरिक आणि स्थायी निवासींच्या कुटुंबांचे निकटचे सदस्य यांच्याशिवाय चीनचा प्रवास करून आलेल्या नागरिकांना प्रवेशबंदी असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Nirbhaya Case: दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राच्या विनंतीनंतर निर्णय ठेवला राखून

Ind Vs NZ : अखेरच्या सामन्यातही भारताचा न्यूझीलंडवर विजय; मालिकेत ५-० असे निर्भेळ यश

China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू 

पदवीधारकांसाठी 5 हजार, पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतVisaव्हिसाDeathमृत्यू