बीजिंग - चीनमध्येकोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 722 लोक मृत्युमुखी पडले असून 34546 जणांना त्याची लागण झाली आहे. चीनमध्ये शुक्रवारी (7 फेब्रुवारी) एका दिवसात तब्बल 86 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. अवघ्या 15 सेकंदात एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील एका 56 वर्षीय व्यक्तीला 15 सेकंदात कोरोनाची लागण झाली. बाजारामध्ये फक्त 15 सेकंदासाठी महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या भीषण धोक्याबद्दल इशारा देणाऱ्या पहिल्या आठ डॉक्टरांपैकी डॉ. ली वेनलिआंग यांचा याच विषाणूने गुरुवारी बळी घेतला होता. या डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश चीन सरकारने दिले आहेत. ही चौकशी करण्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने एक उच्चस्तरीय चौकशी समिती तातडीने वुहान शहरात पाठविली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एअर इंडिया, इंडिगोसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी आपली विमाने काही दिवसांसाठी रद्द केली आहेत. सध्याच्या काळात चीनला जाणे टाळा अशा सूचना भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना दिल्या आहेत. जपानच्या समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस नावाच्या क्रूझमध्ये कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांची संख्या आता 61 झाली आहे. या क्रूझमधील एक प्रवासी गेल्या आठवड्यात हाँगकाँगला उतरला. त्याची तपासणी केली असता तो कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या क्रूझमधील प्रवाशांपैकी 273 जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. क्रूझवर कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आदी देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर तेथून विशेष विमानाने दिल्लीत आणलेल्या 640 पैकी एकाही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे त्या विषाणूचा भारताला धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या सर्वांना आणखी काही दिवस एकांतवासामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय होईल. चीनच्या वुहानमध्ये व अन्य प्रांतांत कोरोना लागण होऊ न शेकडो लोक मरण पावले आहेत आणि 25 ते 30 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. त्या विषाणुमुळे अनेक लोक मरण पावत असल्याने भारताने गेल्या आठवड्यात एअर इंडियाची विमाने पाठवून तेथून 640 भारतीयांना परत आणले. त्यात बहुतांशी विद्यार्थी आहेत.
कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे भारतीय महिला हॉकी संघाला प्रस्तावित चीन दौरा रद्द करावा लागला आहे. यामुळे हॉकी इंडियापुढे ऑलिम्पिकच्या तयारीचे कठीण आव्हान उभे झाले. भारतीय संघाला 14 ते 25 मार्च या काळात चीनला जायचे होते. मात्र दौरा करावा लागला. भारताची कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, हा दौरा महत्त्वपूर्ण होता. प्रो हॉकी लीगमुळे दौऱ्यासाठी अन्य देश उपलब्ध नाहीत. तयारीसाठी बलाढ्य संघांविरुद्ध खेळणे आवश्यक असल्याने पर्यायाचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
NZ vs IND, 2nd ODI: टीम इंडियाचे कमबॅक; पण, न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा जबरदस्त पलटवार
Delhi Election 2020 Live Updates : 110 वर्षीय आजीने केलं मतदान
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपीची मध्यरात्री न्यायालयीन कोठडीत रवानगी
देशातील माता-भगिनींचे मला सुरक्षा कवच; मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल