लडाख आणि अरुणाचल प्रदेशवर नजर ठेवून चीन आता अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर आपला झिनजियांग प्रांत विकसित करू लागला आहे. तज्ज्ञ म्हणतात, ड्रॅगनच्या या हालचालींमुळे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर संकट ओढावण्याची शक्यता आहे. चीनने लाखो लोकांच्या जीवनाचा मुख्य आधार असलेल्या भारतीय उपखंडात वाहणा-या दोन प्रमुख नद्या ब्रह्मपुत्रा आणि सिंधूच्या प्रवाहांचे रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. चीन पाण्याचा शस्त्र म्हणून उपयोग करण्याच्या तयारीत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ड्रॅगनच्या या हालचाली रोखण्यासाठी भारताने 'आंतरराष्ट्रीय बहुपक्षीय चौकट' निर्माण करावी, अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.चिनी ड्रॅगन जगातील सर्वात मोठा बोगदा तयार करणारसिंधू आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही मोठ्या नद्या तिबेटमधून उगम पावतात. सिंधू नदी वायव्य भारतामधून पाकिस्तानमार्गे अरबी समुद्राला मिळते. त्याचवेळी ईशान्य भारतातील ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशातून जाते. या दोन्ही नद्यांचा जगातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये समावेश आहे. चीन बर्याच वर्षांपासून ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलण्यात गुंतलेला आहे. चीनने ब्रह्मपुत्रा नदीला यार्लंग झांग्बो म्हटले आहे, जी भूतान, अरुणाचल प्रदेशातून वाहते. ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या दोन्ही नद्यांचा उगम चीनच्या झिनजियांग भागातून झाला आहे. सिंधू नदी लडाखमार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. लंडनच्या दक्षिण आशिया संस्थेचे डॉ. बर्गिन वाघमार म्हणाले की, सध्याच्या प्रस्तावित प्रकल्पामार्गे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी तिबेटच्या पठारावरून तकलमकानमध्ये 1000 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून नेले जाणार आहे. दक्षिण-पश्चिम शिनजियांगमधील तकलमकान हे वाळवंट आहे. '19व्या शतकात ब्रह्मपुत्र नदी तिबेटपासून शिनजियांगकडे वळविण्याची सूचना किंग राजवंशांनी केली होती.बोगद्याच्या प्रकल्पासाठी 11.7 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च अलीकडेच चिनी प्रशासनाने हा प्रकल्प पुन्हा सुरू केला आहे. ग्रीस प्रांतात सध्या त्याची चाचपणी सुरू आहे. ग्रीसमध्ये बोगदे बनवले जात आहेत. असा विश्वास आहे की, हे तंत्र नंतर झिनजियांगमध्ये वापरले जाईल. असे सांगितले जात आहे की, 600 किमी लांबीच्या ग्रीक बोगद्याचे बांधकाम ऑगस्ट 2017मध्ये सुरू झाले. या प्रकल्पाची किंमत 11.7 अब्ज डॉलर्स आहे.चीनने यापूर्वीच ब्रह्मपुत्राची उपनदी असलेल्या शिआबूकूचा प्रवाह थांबविला आहे. अलीकडे गल्वान खो -यातील संघर्षानंतर चीननेही गल्वान नदीचे पाणी भारतात जाण्यापासून रोखले. गल्वान नदी ही सिंधूची उपनदी आहे आणि चीनने व्यापलेल्या अक्साई चीनपासून उगम पावते. तिबेटी प्रकरणातील तज्ज्ञ क्लाउड अर्पी यांच्या मते, पश्चिम तिबेटमधील लडाखमध्ये प्रवेश करण्यापूर्वी चीनला सिंधू नदीचे प्रवाह झिनजियांगच्या तारिम खो-यात वळवायचे आहे.1000 किमी लांबीचा चिनी बोगदा जगातील 'आश्चर्य' असेलजुलै 2017 मध्ये चिनी सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सने याची खातरजमा केली. 20 चिनी तज्ज्ञांनी जुलै 2017मध्ये झिनजियांगची राजधानी उरुमकी येथे भेट दिली होती आणि तिबेट ते झिनजियांगपर्यंत नदीचं पाणी बोगद्यामार्फत नेण्याची चर्चा केली होती. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या धर्तीवर झिनजियांगचा विकास करायचा आहे, असे चिनी अभियंत्यांचे म्हणणे आहे. यासाठी आम्हाला 1000 किमी लांबीच्या बोगद्याद्वारे झिनजियांगमध्ये एक प्रचंड धबधबा बांधायचा आहे. चीन आता पूर्व मागासलेल्या आपल्या पूर्व भागाच्या विकासानंतर पश्चिम भागात विकासास प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. झिनजियांगमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. तिबेटमधून पाणी आणून ही उणीव दूर केली जाईल.तिबेट ते झिनजियांगपर्यंत पाणी नेणारा हा बोगदा खूप खास असेल. तो तयार करण्यासाठी प्रति किमी 14.73 दशलक्ष डॉलर्स लागतील. दरवर्षी त्या बोगद्याद्वारे 10 ते 15 अब्ज टन पाणी पाठविले जाऊ शकते. या प्रकल्पामुळे चीनच्या या भागातील पाणीटंचाई दूर होईल, असा चीनचा दावा आहे. पहिल्या टप्प्यात चीन एकूण 21.8 अब्ज घनमीटर पाण्याची क्षमता असणारी 29 जलाशयांची निर्मिती करेल. दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या बोगद्यामुळे जैवविविधता नष्ट होईल आणि भूकंपाचा धोका देखील असेल. यापूर्वीही इतिहासामध्ये असे प्रयत्न झाले, पण त्याचा परिणाम फारच त्रासदायक झाला आहे.भारत, पाकिस्तान, बांगलादेशातील कोट्यवधी लोकांवर संकटड्रॅगनच्या या योजनेमुळे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात संकट ओढावू शकते. भारत आणि बांगलादेशचा पूर्वोत्तर विभाग ब्रह्मपुत्रेशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. अशीच परिस्थिती लडाख आणि पाकिस्तानच्या सिंधू पाण्याची आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनला आता पाण्याचे ‘शस्त्र’ म्हणून वापरायचे आहे. भारतीय सीमेच्या अगदी आधी ब्रह्मपुत्रा नदीला सांग्री काऊंटीकडे वळविण्याची चीनची योजना आहे. याच क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये 2017 मध्ये डोकलामावरून संघर्ष झाला. या घटनेनंतर चीन मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात मग्न आहे.या विशाल बोगद्यातून नद्या नियंत्रित करून चीनला भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चोक पॉइंट तयार करायचा आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पांना संरक्षण देण्यासाठी चीनला मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावे लागणार असून, यामुळे भारताची समस्या वाढेल. तिबेटमध्ये जितका चीनचा विकास होईल, तितका सैन्य तैनात करावे लागेल. यामुळे भारतीय सीमेवर सैन्य तैनात करण्यात आणखी भर पडेल. चीन अजूनही भारताची आगपाखड करतच आहे. सिंधू नदी पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमधून पाकिस्तान, पंजाब या गहू उत्पादक राज्यांतून जाते. चीनच्या या निर्णयामुळे तेथे पाण्याचे तीव्र संकट उद्भवू शकते. चीनच्या या संकटाला तोंड देण्यासाठी भारतानं अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाची मदत घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
जगातील सर्वात मोठा बोगदा बनवतोय चीन; भारत, पाक अन् बांगलादेशवर 'महा'जलसंकटाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 2:46 PM