शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

भीषण! चीन भूकंपाने हादरला, 126 इमारती कोसळल्या; गॅस पाइपलाइन फुटल्याने हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 10:53 AM

चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. इमारती कोसळल्या. अनेकजण जखमी झाले.

चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. इमारती कोसळल्या. अनेकजण जखमी झाले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.5 इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी सकाळी लोक झोपले असताना भूकंप झाला. लोक गाढ झोपेत होते. भूकंपाचा केंद्रबिंदू देझोऊ येथे होता. केंद्राची खोली फक्त 10 किलोमीटर होती. 126 इमारती जमीनदोस्त झाल्या. तर 21 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बीजिंगपासून 300 किलोमीटर अंतरावर होता. चीनी भूकंप नेटवर्क केंद्रांचे म्हणणे आहे की भूकंपाची तीव्रता 5.5 होती, परंतु अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने रिश्टर स्केलवर 5.4 तीव्रता दिली आहे. चीनी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत. इमारती, बाउंड्री वॉल कोसळल्याने डेब्रिज रस्त्यावर पसरले होते. अंधारात जीव वाचवण्यासाठी धावणारे लोक या ढिगाऱ्यांवर आदळले आणि पडून जखमी झाले. शहरात बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

भूकंपाची तीव्रता पाहून गाड्या थांबवण्यात आल्या. रेल्वे ट्रॅकची पाहणी केली जात आहे. त्याचा परिणाम रस्त्यांवरही झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होता. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाचे म्हणणे आहे की, हे केंद्र पृष्ठभागापासून फार खोल नव्हते. अशा स्थितीत आणखी विध्वंस होण्याची शक्यता आहे. धोक्यामुळे गॅस पुरवठाही बंद करण्यात आला आहे. पाइपलाइनच्या तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. अनेक भागात पाइपलाइन खराब झाली आहे.

भारतात जाणवले भूकंपाचे धक्के 

भारताची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरपासून चंदीगड-पंजाबपर्यंतच्या लोकांना हा धक्का बसला. अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळीही 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जूनपासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 12 लहान-मोठे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जूनमध्ये डोडा येथेही भूकंपाचे अनेक धक्के जाणवले होते. 13 जून रोजी 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता ज्यामध्ये डझनभर घरांचे नुकसान झाले होते. अफगाणिस्तानात दररोज भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तुर्की-सीरिया सीमा भागात 7.8 स्केलच्या भूकंपाने मोठा विध्वंस केला होता. तुर्कीच्या भूकंपात 59000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :chinaचीनEarthquakeभूकंप