बीजिंग- पाकिस्ताननं पुलवामा हल्ला आणि भारतीय सैन्याच्या तळांना लक्ष्य केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव पराकोटीला गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीननं पाकिस्तानात ये-जा करणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच चीननं पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करणाऱ्या विमानांचा मार्गही बदलला आहे. चीननं सार्वजनिकरीत्या ही माहिती दिली आहे. पाकिस्तानद्वारे हवाई क्षेत्रातील उड्डाणांना बंदी घातल्यानं यूरोप आणि उत्तर पूर्व आशियाचे मुख्य मार्ग प्रभावित झाले आहेत. जगभरात अनेक यात्री विमानतळांवर अडकून पडले आहेत. मध्य पूर्वेतून उड्डाण भरणारी विमानं पाकिस्तानच्या सीमेवरून जातात. चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी भारत, म्यानमार किंवा मध्य आशिया मार्गे विमानांची दिशा बदलावी लागली आहे.बीजिंगच्या आंतरराष्ट्रीय हवाई तळांवरून बुधवारी आणि गुरुवारी पाकिस्तानात ये-जा करणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जी उड्डाणं आज करण्यात येणार होती, त्यांचं वेळापत्रकही कोलमडलं आहे. रिपोर्टनुसार, चीनमधून प्रत्येक आठवड्याला 22 उड्डाणं पाकिस्तानात ये-जा करतात. यात एअर चायनाची दोन आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इतर विमानांचा समावेश आहे.सिव्हिल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना(सीएएसी)ने आपत्काळासाठी एक योजनाही बनवली आहे. ज्यात देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांनाही चीनच्या हवाई दलाला यासंदर्भात माहिती द्यावी लागणार आहे. सीएएसीनं प्रवाशांनाही काही सूचना केल्या आहेत. कोणत्याही प्रवासाची योजना ठरवण्यापूर्वी विमानांसंदर्भात माहिती घ्या.
भारतातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं पाकमध्ये ये-जा करणारी सर्व उड्डाणे केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 2:52 PM