अमेरिका आणि चीनमधील तणाव आता जगाला संकटात टाकणार आहे. चीनने अमेरिकेला इशारा देण्यासाठी दोन महत्वाच्या खनिजांच्या निर्यातीवर प्रतिबंध आणला आहे. या दोन खनिजांवर जगाचे भविष्य अवलंबून आहे. तीच बंद केल्याने जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनुसार चीन पश्चिमेकडील पुरवठा साखळी उध्वस्त करण्यासाठी ताकदीचा वापर करू लागला आहे. या दोन खनिजांमुळे सेमीकंडक्टर, सौर पॅनेल आणि मिसाईल सिस्टिमचे उत्पादन केले जाते.
या दोन खनिजांचे नाव आहे लिथिअम आणि कोबाल्ट. चीनने यापूर्वी गॅलिअम आणि जर्मेनिअम या खनिजांवरही निर्यात बंदी आणली आहे. जगातील लिथियम आणि कोबाल्टपैकी सुमारे दोन तृतीयांश खनिजावर चीनमध्ये प्रक्रिया केली जाते. इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी हे सर्वात महत्वाचे खनिज आहे. याशिवाय, जगातील सुमारे 60 टक्के अॅल्युमिनियमचा स्रोत देखील चीनमध्ये आहे. चीनमध्ये 80 टक्के पॉलिसिलिकॉन देखील सापडते. हे सौर पॅनलमध्ये वापरले जाणारे महत्वाच घटक आहे. या सर्वांचा वापर टच स्क्रीन स्मार्टफोन आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानामध्ये केला जातो.
हे सर्व चीनमध्ये सापडत नाहीय, तर ते दुसऱ्या देशांमध्ये सापडते परंतू त्यावर मालकी चीनची आहे. निकेल पुरवठ्याचा एक महत्त्वाचा भाग थेट चीनमधून येतो, परंतु उर्वरित भाग देखील चीनच्या नियंत्रणाखाली आहे.इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनी सारख्या देशांच्या खाणींमधून काढले जाते, ही प्रक्रिया चिनी कंपन्या करतात. जगातील खनिजांवर चीनची पकड असून यामुळे पाश्चात्य देशांच्या ऊर्जा, चिप उत्पादन आणि संरक्षण उद्योगांना धक्का पोहोचू शकणार आहे.
लिथियम किंवा कोबाल्टच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या चीनच्या निर्णयाचा जगभरातील वाहन उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. जगभरातील इलेक्ट्रीक बॅटरींच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.