चीन पुन्हा एकदा काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु फ्लूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या कारणास्तव, चिनी अधिकारी काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करू इच्छित आहेत. या निर्णयानंतर लोकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. लोक म्हणतात की असे केल्याने कोरोनाच्या काळातील परिस्थिती होईल.
चीनच्या शीआन शहरात लॉकडाऊनबाबत इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन जारी करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील संक्रमित क्षेत्रे बंद केली जाऊ शकतात. ट्रॅफिक कमी करण्याचे आदेशही दिले जाणार आहेत. शॉपिंग मॉल्स, थिएटर, लायब्ररी, पर्यटन स्थळे आणि इतर गर्दीची ठिकाणेही बंद राहतील.
इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅननुसार सर्व स्तरांवर शाळा आणि नर्सरी बंद राहतील. शीआनची लोकसंख्या सुमारे 13 मिलियन आहे. हे शहर देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. लॉकडाऊनच्या बातम्यांबाबत लोकांनी सोशल मीडियावर शहर प्रशासनावर टीका केली आहे. एका युजरने वीबोवर सांगितले की, लॉकडाऊन लावण्याऐवजी जनतेचं लसीकरण करा.
औषधांचा तुटवडा
आणखी एका युजरने लिहिले की, अशा बातम्यांमुळे लोक घाबरतील. शीआन राष्ट्रीय स्तरावर यावर योजना आखत आहे. हे योग्य नाही. चीनमध्ये फ्लूचे रुग्ण वाढण्याबरोबरच काही फार्मसीमध्ये औषधांचा तुटवडाही निर्माण झाला आहे.
चीनमध्ये कडक लॉकडाऊन
विशेष म्हणजे, कोरोना महामारीदरम्यान, चीनने जगातील सर्वात गंभीर कोविड निर्बंध लागू केले. ज्यामध्ये काही शहरांमध्ये अनेक महिने लॉकडाऊनचा समावेश करण्यात आला होता. शीआन शहरात डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान कडक लॉकडाऊन होता. यावेळी अनेकांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता. तसेच वैद्यकीय सेवेवरही परिणाम झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"