शेनझेन : दुसऱ्या देशांच्या जमिनी बळकावण्याच्या इराद्याने ताकद वाढविणाऱ्या चीनने हाँगकाँगवर वाईट नजर ठेवली असून त्यांचे लाखोंच्या संख्येने सैन्य हाँगकाँगच्या सीमेवर पोहोचले आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीन छोटे छोटे देश, प्रदेश ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. हाँगकाँगपासून केवळ 7 किमी अंतरावर असलेल्या शेनझेन शहरातील एका मोठ्या स्टेडिअममध्ये चीनच्या सैनिकांनी परेड केली. दहशतवादी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी चीनने या सैन्याची स्थापना केली आहे. या पीएपी जवानांसोबत मोठ्या प्रमाणावर युद्धात वापरण्यात येणारी वाहने दिसल्याने हाँगकाँगचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे दिसत आहे.
हाँगकाँग हा स्वतंत्र देश आहे. या देशामध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या आंदोलनांना चीनच्या हालचालींशी जोडून पाहिले जात आहे. गेल्या दहा आठवड्यांपासून ही आंदोलने होत आहेत. यामुळे चीन यामध्ये हस्तक्षेप करू शकते. या आदोलनांमुळे आशियातील प्रमुख अर्थव्यवहारांच्या केंद्राचे कामकाज ठप्प झाले आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबर टाईम्सचे प्रमुख संपादक हू शिजिन यांनी सांगितले की, शेनझेनमध्ये सैन्याची हजेरी म्हणजे हाँगकाँगमध्ये चीन हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे संकेत आहेत. जर तेथील सरकारविरोधात आंदोलने थांबली नाहीत तर चीन केव्हाही सैनिकी कारवाई करण्यासाठी घुसू शकते.
ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली आहे चीनच्या हालचालींमुळे अमेरिकाही चिंतेत आहे. आंदोलकांविरोधात चीन सैनिकी कारवाई करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. गुप्तहेर संघटनेच्या माहितीनुसार चीन कधीही सैन्य पाठवू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच तेथे सर्व शांततेत असेल, कोणाचे नुकसान किंवा मृत्यू होणार नसल्याची आशा व्यक्त केली आहे.