शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:00 PM

४ महिन्यांपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता झाले होते

China names Dong Jun as new defence minister: ४ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता चीनला नवा संरक्षण मंत्री मिळाला आहे. ४ महिन्यांपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, आता नौदल कमांडर डोंग जून यांना संरक्षण मंत्री करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोंग जून यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी चीनचे परराष्ट्र मंत्री चिन गँग अनेक महिने बेपत्ता होते आणि नंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले. चीनच्या सर्वोच्च विधिमंडळ, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) ने या वर्षी ऑक्टोबरमध्ये ली शांगफू यांची हकालपट्टी मान्य केली होती. आता, चीनने जनरल ली शांगफू यांना कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय हटवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर, शुक्रवारी नौदल कमांडर जनरल डोंग जून यांना देशाचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

एनपीसीनेही नावाला मंजुरी दिली

पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही (PLAN) चे कमांडर डोंग जून यांची एनपीसीच्या स्थायी समितीने संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केल्याचे नवीन नियुक्तीबाबत अधिकृत माध्यमांनी वृत्त दिले आहे. डोंगबद्दल फारशी माहिती नाही, आणि त्याचे वय देखील माहित नाही, परंतु त्यांनी PLAN च्या सर्व प्रमुख नौदल विभागात काम केले आहे. हाँगकाँग-आधारित साउथ चायना मॉर्निंग पोस्टने अहवाल दिला. त्या अहवाला नमूद करण्यात आले होते की, २०२१ मध्ये नौदलाचे सर्वोच्च कमांडर होण्यापूर्वी, डोंग नॉर्दर्न फ्लीटमध्ये कार्यरत होते, जे आता नियमितपणे रशियन नौदल, इस्टर्न फ्लीटसह संयुक्त सरावांमध्ये भाग घेते. आणि ते जपानसोबतच्या संभाव्य विवादांवर लक्ष केंद्रित करते, त्याचप्रमाणे दक्षिण चीन समुद्रावर लक्ष ठेवणाऱ्या सदर्न कमांड थिएटरमध्येही त्यांनी काम केले आहे. देशाच्या सर्वोच्च संरक्षण पदांवरील नियुक्त्यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे, जे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे (CPC) सरचिटणीस असण्यासोबतच केंद्रीय लष्करी आयोगाचे (CMC) प्रमुख देखील आहेत.

परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री दोघेही बेपत्ता

यापूर्वी दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले संरक्षण मंत्री ली शांगफू यांना ऑक्टोबरमध्ये बडतर्फ करण्यात आले होते. २५ ऑगस्ट रोजी ते शेवटचे सार्वजनिकरित्या दिसले होते. शांगफू यांना या वर्षी मार्चमध्ये संरक्षण मंत्री करण्यात आले होते आणि ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी अतिशय जवळचे मानले जातात. याआधी परराष्ट्र मंत्री चिन गँग यांनाही दीर्घकाळ बेपत्ता झाल्यानंतर जुलैमध्ये पदावरून हटवण्यात आले होते. चिन यांच्या जागी वांग यी यांना नवे परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले. शांगफूबद्दलच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. चीनमध्ये मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया जुनी आहे. संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्या आधीही अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. सध्या, चिन गँग आणि ली शांगफू या दोन बरखास्त केलेल्या प्रमुख मंत्र्यांचा ठावठिकाणा माहीत नाही.

टॅग्स :chinaचीनDefenceसंरक्षण विभागXi Jinpingशी जिनपिंगministerमंत्री