नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. याच दरम्यान आता चीनने भारताला लुबाडण्यासाठी एक नवी चाल केली आहे. आवश्यक वस्तूंचे भाव वाढवण्यात येणार आहे.
भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. भारतीय औषध कंपन्या त्यांच्या गरजेच्या 70 टक्के API चीनकडून आयात करतात. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनवर अनेक बाबींसाठी अवलंबून आहे. त्यामुळे आता चीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. भारत दरवर्षी सुमारे 39 अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध तयार करण्यासाठी आवश्यक स्टार्टिंग मटेरियल, API साठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे.
एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारत अवलंब असल्याचा गैरफायदा घेऊ लागला आहे. API च्या किंमती वाढल्याने औषधांच्या किमती वेगाने वाढू लागल्या आहेत. Paracetamol ची किंमत 27 टक्के, ciprofloxacin ची किंमत 20 टक्के, penicillin G ची किंमत 20 टक्के याच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रत्येक प्रकारच्या फार्मा प्रोडक्टच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल
'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी
"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा
मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा