चीनच्या रस्त्यांवर रणगाड्यांची रांग पाहून अनेकांना धक्का बसला आहे. स्थानिक माध्यमांचा हवाला देत Reddit युझर्सनं ते फुटेज शेन्डॉंग क्षेत्रातील रिझाओ येथील असल्याचं म्हटलं आहे. येथे एका बँकेची स्थानिक शाखा वाचवण्यासाठी रस्त्यांवर रणगाडे उतरवण्यात आले होते. अनेक रणगाडे रांगेत उभे असून ते लोकांना त्या ब्रान्च पर्यंत जाण्यापासून रोखत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये स्थानिक लोकांमध्ये संताप असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, Reddit युझरनं या घटनेची तुलना १९८९ मधील तियानमेन घटनेशी केली आहे. त्यावेळी शेकडो रणगाड्यांचा वापर लोकशाहीच्या समर्थकांचा विरोध हाणून पाडण्यासाठी केला जात होता. हा मुद्दा पहिल्यांदा एप्रिल महिन्यात समोर आला होता. साऊथ चायना मॉर्निग पोस्टनं एका लेखात हेनान आणि अन्हुई क्षेत्रातील लोकांना सिस्टम अपग्रेडमुळे बँक खात्यांचा अॅक्सेस दिला जात नसल्याचं म्हटलं होतं.
तेव्हापासून युझोऊ शिनमिनशेंग (Yuzhou Xinminsheng) व्हिलेज बँक, शँगकाऊ हुईमिन काउंटी बँक (Shangcai Huimin County Bank), झेचेंग हुआनगुआई कम्युनिटी बँक ( Zhecheng Huanghuai Community Bank) आणि हेनान प्रांतातील यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ कायफेंग (Oriental Country Bank of Kaifeng), नजीकच्याच अनहुई प्रांतातील गुझेन शिंनहुआइहे व्हिलेज बँक (Guzhen Xinhuaihe Village Bank) प्रभावित झाल्या आहेत.