रंगून - भारत आणि जपानला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनविरोधात आता म्यानमारनेही आपली भडास काढली आहे. म्यानमारच्या लष्कर प्रमुखांनी चीनला इशारा देत म्हणटले आहे, की चीनने येथील दहशतवादी गटांना शस्त्र पुरवठा करू नये. यासंदर्भात लष्कर प्रकमुखांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहकार्याची मागणी केली आहे.दक्षिण पूर्व आशियात, म्यानमार हा चीनचा सर्वात जवळील शेजारी असल्याचे मानले जाते.
म्यानमारच्या लष्कर प्रमुखांचा चीनवर निशाणा -रशियातील सरकारी वाहिनी Zvezdaला दिलेल्या मुलाखतीत म्यानमार लष्कर प्रमुख जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी म्हटले आहे, की त्यांच्या देशातील सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमागे मोठ्या शक्तीचा हात आहे. म्हणून त्यांनी आता आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली आहे. लष्कर प्रमुखांच्या, मोठ्या शक्ती म्हणण्याला चीनशी जोडून बघितले जात आहे.
चीन अराकान आर्मीला पुरवतो शस्त्रास्त्र -म्यानमारचे सैन्य प्रवक्ता ब्रिगेडिअर जनरल जॉ मिन टुन यांनी यावेळी, म्यानमारच्या शस्त्र दलाच्या कमांडर-इन-चीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा केली. प्रवक्त्याने म्हटले आहे, सेना प्रमुखांनी अराकान आर्मी (एए) आणि अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीचा (एआरएसए) उल्लेख केला. या दोन्हीही संघटना चीनला लागून असलेल्या रखाईन प्रांतात सक्रिय आहेत.
दहशतवाद्यांना शस्त्र पुरवण्यामागे हे कारण -म्यानमारने आपल्या बेल्ट अँड रोड प्रोजक्टला मंजुरी द्यावी, अशी चीनची इच्छा आहे. यामुळे म्यानमार सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी चीन दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करत आहे. मात्र, म्यानमार चीनच्या या प्रोजेक्टला मंजुरी देण्यास तयार नाही. चीन भारताविरोधातील दहशतवादी गटांनाही कश्मीरात हल्ला करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
छापेमारीत दहशतवाद्यांकडे आढळून आले सरफेस टू एअर मिसाइल -जनरल मिन आंग ह्लाइंग यांनी म्हटले आहे, की अराकान आर्मीच्या पाठीशी मोठ्या देशाचा हात आहे. 2019 पासून या दहशतवादी संघटना चिनी शस्त्रांनी आणि लँड माइनच्या सहाय्याने म्यानमारच्या सैनिकांवर हल्ला करत आहेत. नोव्हेंबर 2019मध्ये म्यानमारच्या सैनिकांनी टाकलेल्या एका छाप्यात बंदी असलेल्या टांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला होता. यात सरफेस टू एअर मिसाइल्सदेखील होते. सांगण्यात येते की या शस्त्रांची किंमत 70,000 ते 90,000 अमेरिकन डॉलर एवढी होती. हे शस्त्र मेड इन चायना होते.
महत्त्वाच्या बातम्या -
भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!