शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

चीनचा विकृत चेहरा उघड; नदीचे पाणी रोखल्याने चार देश तडफडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 3:12 PM

चीनने दक्षिण पूर्व आशियाई देशांमधून वाहणाऱ्या मेकांग नदीच्या पाण्याच्या प्रवाह कमी केला आहे. यातून चीनचा अमानवी चेहरा समोर आला आहे.

बँकॉक : जगाला कोरोना व्हायरसच्या विळख्यात टाकलेल्या चीनमध्ये व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. या देशाने आता जगभरात चाचणी किट्स, पीपीई किट्स पुरवायाला सुरुवात केली असून इटलीला तर त्यांनीच मदत म्हणून पाठविलेली किट्स वापरून विकली होती. आता या देशाने नदीचे पाणी रोखून चार देशांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण केली आहे. 

चीनने दक्षिण पूर्व आशियाई देशांमधून वाहणाऱ्या मेकांग नदीच्या पाण्याच्या प्रवाह कमी केला आहे. यातून चीनचा अमानवी चेहरा समोर आला आहे. या पाणी रोखल्यामुळे थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. या देशांची हालत एवढी गंभीर बनली आहे की, कोरोनाच्या विळख्यातही शेतकरी, मच्छीमारांना आंदोलने करावी लागत आहेत. चीनच्या या पावलामुळे भारतात येणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्यावरही शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीन फेब्रुवारीमध्ये कोरोनाशी लढत होता. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्र्याला अचानक लाओसला जावे लागले होते. कारण दक्षिण पूर्वेकडील आशियाई देशांची जीवनवाहिनी म्हटली जाणारी मेकांग नदीचे पाणी आटायला लागले होते. यामुळे तेथे शेतकरी मच्छीमारांनी आंदोलन सुरु केले होते. यासाठी चीनचे मंत्री वांग यी यांना लाओसला जावे लागले होते. 

यावेळी वांग यांनी सांगितले होते की, शेतकरी मच्छीमारांचे दु:ख समजू शकतो. चीनही यंदा दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे मेकांग नदीचे पाणी कमी झाले आहे. या उलट अमेरिकेच्या जलवायू संशोधकांनी सांगितले की, चीनमध्ये दुष्काळ पहिल्यांदाच पडलेला नाही. तिबेट पठारावरून मेकांग नदी वाहते. या पाण्याच्या प्रवाहाला चीनच्या इंजिनिअरनीच अडकाठी आणली आहे. यामुळे तिचा प्रवाह खूप कमी झाला आहे. 

 

त्या देशांसाठी 'गंगा'मेकांग ही नदी मोठ्या प्रवाहाची आहे. जसे भारतासाला गंगा आणि ब्रम्हपुत्रा नदीचे महत्व आहे तसेच थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांना मेकांगचे आहे. ही नदी या बाजुच्या देशांसाठी गंगा आहे. गेल्या काही वर्षांपासून मध्येच नदीतील पाण्याचा स्तर कमी होतो तर मध्येच पूर आल्यासारखा वाढत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. चीनने या नदीवर मोठ्या प्रमाणावर धरणे उभारली आहेत. 

धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप

CoronaVirus लॉकडाऊन वाढला, तुमचा कारवरील खर्चही वाढू शकतो; ही काळजी जरूर घ्या

 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याThailandथायलंडdroughtदुष्काळ