लोकमत न्यूज नेटवर्क : भारताशी खेटून असलेल्या सीमा असो वा दक्षिण चीन समुद्र असो किंवा मग तैवानशी डोकं लावणे असो वा मग अमेरिकेशी भिडण्याचा प्रयत्न असो. चीनच्या कुरापतींनी सध्या निम्मे जग चिंताक्रांत आहे. त्यातच आता चीनने आपल्या प्रचंड लष्करी ताफ्यामध्ये हायपरसॉनिक मिसाइलचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जागतिक स्पर्धाहायपरसॉनिक मिसाइल आपल्या ताफ्यात रहावे यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने आपल्याकडे हायपरसॉनिक मिसाइल उपलब्ध असल्याचे गेल्याच वर्षी जाहीर केले.रशियाकडेही या मिसाइल निर्मितीची क्षमता आहे. २०१९ मध्ये हायपरसॉनिक मिसाइलची चाचणी घेतल्याचे रशियाने स्पष्ट केले होते.हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे काय?हे मिसाइल सोडल्यानंतर ते मध्येच त्याचे लक्ष्य बदलू शकते. तसेच त्याचा माग ठेवणे शत्रूपक्षासाठी कठीण होते.चीनने गुप्तरित्या हायपरसॉनिक मिसाइलची निर्मिती केली.मुख्यत: अण्वस्त्रांचा मारा करण्यासाठी हायपरसॉनिक मिसाइलचा वापर करता येऊ शकतो. किमी ताशी वेगाने हायपरसॉनिक प्रवास करू शकते. आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक असेल वेगबॅलिस्टिक आणि क्रूझ मिसाइल अशा दोन्ही प्रकारची क्षेपणास्त्रे त्यावरून वाहून नेता येऊ शकतात. भारताकडेही क्षमतासध्या भारत आणि चीनमध्ये वरचेवर खटके उडत आहेत. अशा स्थितीत भारताला चीनकडून धोका आहे. चीनकडे हायपरसॉनिक मिसाइलमुळे भारतातील कोणतेही शहर आता चीनच्या मारकटप्प्यात आले आहे. भारताकडील क्षेपणास्त्रेही चीनच्या कोणत्याही शहराचा वेध घेऊ शकतात.हायपरसॉनिक मिसाइलचे तंत्रज्ञान भारतालाही अवगत असून त्याच्या निर्मितीची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यावर आहे.मिसाइलच्या चाचण्याअलीकडेच चिनी लष्कराने हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल अंतराळात पाठवले. त्याला लाँग मार्च २सी रॉकेट, असे नाव देण्यात आले होते. ऑगस्टमध्ये ही चाचणी घेण्यात आली. मिसाइलने पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारली आणि नंतर लक्ष्याच्या दिशेने कूच केले.परंतु लक्ष्याचा भेद करण्याच्या १२ मैल आधी मिसाइल भरकटले. मिसाइलची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या या दाव्यामुळे अंतराळातील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
भारताला चीनची धडकी! ड्रॅगनच्या ताफ्यात लवकरच हायपरसॉनिक मिसाइलचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:27 AM