अनिश्चित काळासाठी सत्ता काबिज केलेले चीनचेराष्ट्राध्यक्ष आता विद्यार्थ्यांच्या मंदूवरही शासन करण्याच्या विचारात आहे. कमी वयातच विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे विचार बिंबवून विद्यार्थ्यांच्या नजरेत महान बनण्याचं काम त्यांनी आता सुरू केलं आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या १०० व्या वर्धापन दिनापूर्वीच चीनमध्ये यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. पक्षाच्या सेंट्रल कमिटीनं बुधवारी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.सेंट्रल कमिटीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वैचारिक शिक्षणावर जोर देण्यास सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिले दोन वर्ष विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग यांच्या विचारांचे धडे देण्यात यावेत. तसंच विद्यार्थ्यांना क्षी जिनपिंग यांच्या आदेशाचं पालन करण्याची शिकवण देण्यात यावी आणि त्यांनीदेखील तेच केलं पाहिजे जे आपले राष्ट्राध्यक्ष सांगतील, असं या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमधील अधिकाऱ्यांसह लेखकांवरही आपल्या धोरणांमध्ये जिनपिंग यांच्या विचारांना आणि त्यांच्या सिद्धांतांना सामील करण्याचा दबाव आणला जात असल्याचं समोर आहे. तर दुसरीकडे जिनपिंग दे स्वत:ला सर्वोच्च नेते म्हणून सिद्ध करण्यास तसंच देशातील आपलं नियंत्र अधिक मजबूत करण्याचा प्रयत्नही करत आहे. 'आज आपलं सुखी जीवन हे पक्षाचं नेतृत्व आणि समाजवादामुळेच आहे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावं,' असंही यात सांगण्यात आले. चीन सरकारचं वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये यासंदर्भातील गाईडलाईन्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसंच विद्यार्थ्यांचं राजकीय ज्ञान आणि मूल्यांना मजबूत करण्याचं रणनितिक महत्त्वा आणि हे विचार एका पीढीतून दुसऱ्या पीढीतही जातील, असं या गाईडलाईन्ससोबत लिहिण्यात आलं होतं.आणखी एक सरकारी वृत्तपत्र चायना डेलीनंदेखील सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तसंच लहान मुलं हे देश आणि पक्षाचं भविष्य आहेत आणि त्यासाठीच त्यांचा विकास रणनितिक महत्त्व प्राप्त करतो असं चायना डेलीनं म्हटलं आहे.
"विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या," चीनमधील शाळांना अजब आदेश
By जयदीप दाभोळकर | Published: February 04, 2021 5:23 PM
चीनच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या गाईडलाईन्स
ठळक मुद्देचीनच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या गाईडलाईन्सजिनपिंग यांचे विचार विद्यार्थ्यांना शाळेत शिकवण्याचे देण्यात आलेत आदेश