शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

लडाख म्हणजे डोकलाम नाही, युद्धासाठी तयार; चीनची भारताला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 4:23 PM

चीनने म्हटले आहे, की आमच्या सैन्याने भारतासोबत पहाडांत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. चीनने म्हटले आहे, की डोकलाम घटनेनंतर त्यांनी त्यांच्या सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत.

ठळक मुद्देआमच्या सैन्याने भारतासोबत पहाडांत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे.चीनने म्हटले आहे, की डोकलाम घटनेनंतर त्यांनी त्यांच्या सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत.चीनी सैनिक भारतीय जवान गस्ती घालतात त्या आणि रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांत आले आहेत.

पेइचिंग : लडाखच्या गलवान खोऱ्यात आणि पेंगोंग शोच्या भागात कारगिलप्रमाणेच हजारोच्या संख्येने सैन्य तैनात करणाऱ्या चीनने आता भारताला थेट धमकी दिली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्‍लोबल टाइम्‍सने म्हटले आहे, की लडाख म्हणजे डोकलाम नाही. आमच्या सैन्याने भारतासोबत पहाडांत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. चीनने म्हटले आहे, की डोकलाम घटनेनंतर त्यांनी त्यांच्या सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत.

Border Dispute : लडाख सीमेवर तणाव, त‍िबेटमध्ये अंधारात सुरू आहे चीनचा युद्ध सराव

ग्‍लोबल टाइम्‍सने चीनी विश्‍लेषकाच्या हवाल्याने म्हटले आहे, चीनने आपल्या शस्त्रसाठ्यात टाइप 15 टँक, Z-20 हेलिकॉप्‍टर आणि जीजे-2 ड्रोनचा समावेश केला आहे. यामुळे चीनला युद्धाच्या वेळी पहाडांमध्ये आणि ऊंच ठिकाणावर मोठा फायदा होईल. चीनने टाइप 15 टँक गेल्या वर्षीच सैन्यात सामील केले आहेत. चीनी विश्‍लेषकांनी म्हटले आहे, की तिबेटच्या पहाडांमध्ये या टँकच्या सहाय्याने काम करू शकेल. तर, मोठे टँक पोहोचायला त्रास होईल. हे टँक कुठल्याही टँकपेक्षा प्रभावी ठरतील.

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

पीएलएने तैनात केली PCL-181 अत्‍याधुनिक तोफ -चीनच्या विश्‍लेषकांनी म्हटले आहे, की पीएलएने अत्याधुनिक PCL-181 तोफ तैनात केली आहे. 25 टन वजन असलेल्या या तोफेला कुठेही सहजपणे घेऊन जाणे शक्य आहे. तिचे वजन कमी असल्याने ती पहाडांमध्ये सहजपणे घातक हल्ले करू शकते. ती पूर्णपणे स्वयंचलित आणि अर्धस्‍वयंचलित आहे. या दोन्ही तोफा चीनने जानेवारी महिन्यातच तिबेटच्या पठारांवर तैनात करून ठेवल्या आहेत. एवढेच नाही, तर चीनी सैन्याने तिबेटमध्ये भारताच्या सीमेवर मल्‍टिपल रॉकेट लॉन्‍चर सिस्‍टिमही तैनात केली आहे. हे रॉकेट लॉन्‍चर 370 एमएमच्या रॉकेटचा मारा करू शकतात, असेही ते म्हणाले.

'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

ग्‍लोबल टाइम्‍सने म्हटले आहे, की चीनीने Z-20 मालवाहतूक करणारे हेलिकॉप्‍टरदेखील तिबेटमध्ये तैनात केले आहेत. कुठल्याही वातावरणात हे हेलिकॉप्टर सामान अथवा सैन्याला आवश्यक असलेले साहित्य पोहोचवू शकते. याशिवाय Z-8G हे महाकाय ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्‍टरही तैनात करण्यात आलेले आहे.  हे हेलिकॉप्टर 4,500 फुटांवरही काम करू शकते. याशिवाय चीनने शस्त्रास्त्रांनी सज्य असलेले GJ-2 ड्रोन तिबेटमध्ये तैनात करून ठेवले आहेत. यामुळे संपूर्ण तिबेटवर नजर ठेवली जाऊ शकते.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

'चीनी सैन्य कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याचे उत्तर द्यायला तयार'या वृत्तपत्राने दावा केला आहे, की या शस्त्रांस्त्रांच्या बळावर चीनी सैन्य उंचावरील कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला उत्तर देऊ शकते. 

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

सॅटेलाइटच्या छायाचित्रांच्या हवाल्याने सरकारी सूत्रांनी सांगितले, की चीनी सैनिक भारतीय जवान गस्ती घालतात त्या आणि रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांत आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते, की भारत चीनसोबत ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही एका मुलाखतीत भाष्य केले होते.

अभिमानास्पद! कोरोना व्हॅक्सीन बनवणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये भारताची कन्या, बजावतेय महत्वाची भूमिका

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानladakhलडाख