बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांबरोबर 15 जून रोजी झालेल्या संघर्षात चिनी सैनिक मारले गेले होते, अशी कबुली चीनने दिली आहे. मात्र, या संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांहून कमी आहे, असा दावा चीनने काही दिवसांपूर्वी केला आहे. भारत आणि चीनमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पहिल्यांदाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं असून आकडा सांगितला आहे.
गलवान खोऱ्यातील 15 संघर्षात चीनचे पाच सैन्य ठार झाले असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. 'द हिंदू'ने याबाबतचे वृत्त दिलं आहे. भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या पाच चिनी सैन्यांमध्ये चीनच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. याआधी चीनने फक्त एकच सैनिक ठार झाला असल्याचं मान्य केलं होतं. चीनकडून फक्त पाच सैनिक ठार झाले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार, 40 चिनी सैन्य ठार झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गलवानच्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणावात वाढ
40 वर्षांमध्ये पहिल्यांदाचभारत व चीनमध्ये गलवानच्या निमित्ताने भीषण संघर्ष झाला. चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सांगितले होते. गलवानच्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणावात आणखी वाढ झाली. 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर चिनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागावर घुसखोरी करण्याचे केलेले प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले होते. आधी चीनने पुढे सरकण्यास व सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यानंतर भारतही सरसावला आहे.
चीनी लष्कराची मोठी हानी
20 भारतीय जवान शहीद व काही सैनिक गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झाले होते. या घटनेत चीनी लष्कराची मोठी हानी झाली असल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला होता. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राचे संपादक हू शीजिन यांनी राजनाथसिंह यांच्या वक्तव्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण आपल्या ट्विटला जोडून ‘गलवानमधील संघर्षात भारतापेक्षा चीनचे कमी नुकसान झाले आहे, तसेच एकाही चिनी सैनिकाला भारताने ताब्यात घेतलेले नाही. उलट अनेक भारतीय सैनिकांना चिनी लष्कराने पकडले होते. चीनचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले, ही खोटी बातमी आहे’ असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा
"आम्ही आधी हात जोडत होतो, पण आता आपण दिल्ली हादरवू", हरसिमरत कौर यांचा इशारा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता
याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी