बिजिंग - अलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांच्या डोक्यावरील चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा 'ताज' आता उतरला आहे. चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झीली आहे. तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. (China Under government scrutiny Jack Ma not chinas richest man anymore)
हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र, आता यासंदर्भात ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. आता जॅक मा यांच्यावर बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपनीचे मालक झोंग शानशान, टेनसेंट होल्डिंगचे पोनी मा, ई-कॉमर्स कंपनी अपस्टार्ट कोलिन हुआंग हे आहेत.
चीनला जबर झटका देण्याच्या तयारीत अमेरिका; संसदेत विधेयक सादर, करण्यात आली मोठी मागणी
रेग्युलेटर्सवरील टीकेनंतर जॅक मा यांच्या कंपन्यांवर कारवाई -हुरून लिस्टनुसार, चीनच्या रेग्युलेटर्सकडून अलीबाबा आणि अँट ग्रुपविरोधात केलेल्या कारवाईनंतर जॅक मा यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक व्यासपीठावरून चीनच्या रेग्युलेटरी सिस्टमवर कथित भेदभावाचा आरोप केला होता. यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलर्सचा आयपीओ टळला होता.
शी जिनपिंग यांच्याकडे बोट -वॉल स्ट्रिट जनरलच्या वृत्तानुसार, जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडूनच आला होता. यानंतर क्रिसमसच्या पूर्व संध्येला, जोवर आपल्या अलिबाबा गृप विरोधातील चौकशी पूर्ण होत नही, तोवर देशाबाहेर जाऊ नये, असा आदेशही जॅकमा यांना देण्यात आला होता. या कारवाईनंतर जॅक मा फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. एवढेच नाही, तर चीन सरकारने त्यांना गायब केल्याचेही वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. चीनमध्ये रेग्युलेटरी नियमांवर टीका करणाऱ्या उद्योजकांना सातत्याने निशाणा केले जात आहे.
अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण