न्यूयॉर्क : चीनच्या सैन्याच्या मालकीच्या अथवा त्यांच्या नियंत्रणातील २० कंपन्यांची यादी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने तयार केली आहे. या कंपन्यांवर अमेरिका निर्बंध आणू शकते. या कंपन्यांच्या यादीत हुआवेई टेक्नॉलॉजी कंपनी आणि हांग्जोउ हिकव्हिजन डिजिटल टेक्नॉलॉजी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.संसद सदस्यांना २४ जून रोजी पेंटागनने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अमेरिकेत काम करणाऱ्या आणि चीनच्या सैन्याकडून नियंत्रित असलेल्या कंपन्यांची यादी पाठवित आहोत. या यादीचा उल्लेख १९९९ च्या संरक्षण धोरणात यापूर्वी झालेला आहे. चीन आणि अमेरिका या दोन देशांतील संबंध अलिकडच्या काळात बिघडत चाललेले आहेत. तसेच, अमेरिकेत हे निवडणूक वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर या पावलाकडे पाहिले जात आहे.>या कंपन्या आहेत यादीतअमेरिकेने ज्या चिनी कंपन्यांची यादी तयार केली आहे त्या याप्रमाणे -अॅव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन आॅफ चायना, चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन, चायना एअरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन, चायना इलेक्ट्रिक्स टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशन, चायना साउथ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पो., चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री, चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पो., चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पो., हुआवेई टेक्नॉलॉजी कॉर्पो., हांग्जोउ हिकव्हिजन डिजिटल टेक्नॉलॉजी कॉर्पो., इन्सपूर गु्रप, एअरो इंजिन कॉर्पो. आॅफ चायना, चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन कॉर्पो., सीआरआरसी कॉर्पो., पांडा इलेक्ट्रॉनिक ग्रुप, दवनिंग इन्फॉर्मेशन इंडस्ट्री कॉर्पो., चायना मोबाइल कम्युनिकेशन ग्रुप, चायना जनरल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पो., चायना नॅशनल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पो., चायना टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन.
चीन अन् अमेरिकेमध्ये तणाव वाढणार; २० चिनी कंपन्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्बंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 3:56 AM