वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विजयी ठरलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून येणारे दडपण कमी करण्यासाठी चीननेभारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अग्नी यांनी सांगितले.
यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अग्नी म्हणाले की, चिनी बनावटीच्या वस्तूंवर सुमारे ६० टक्के शुल्क आकारण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा प्रचार करताना बोलून दाखविला होता. भारताबरोबर संबंध सुधारावेत यासाठी ट्रम्प चीनवर दबाव आणणार हे स्पष्टच आहे. त्यामुळेच सीमाप्रश्नावर चीन तोडगा काढायला तयार झाला. आता ते भारताला पूर्वीपेक्षा अधिक व्हिसा देखील देतील.
आग्नेय आशियाई देशांकडून चीनचा निषेध
आशिया-पॅसिफिकमध्ये चीनबरोबर सागरी क्षेत्रातील वाद वाढत असताना तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियातील देशांचे संरक्षणमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी यांची बुधवारी लाओसमध्ये एक बैठक झाली. सागरी क्षेत्रात चीनने सुरू ठेवलेल्या कारवायांचा या देशांनी निषेध केला आहे.