चीनमध्ये 'मुइफा' वादळाचे थैमान पाहायला मिळत असून मुसळधार पावसाने कहर केला आहे. 'मुइफा' चक्रीवादळ गुरुवारी चीनच्या पूर्व किनार्याकडे सरकलं आहे. वादळामुळे शांघाई शहरात जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस पडला. चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ बुधवारी किनारपट्टीवर 125 किलोमीटर (77 मैल) प्रति तास वेगाने वाऱ्यासह आले. शांघाई परिसरात वादळामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही
दक्षिण शांघाईमधील निंगबो शहरात पाणी साचल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. या फोटोमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक स्कूटर आणि कार पाण्यात बुडालेल्या दिसत आहेत. वादळाच्या तडाख्याने जिआंग्सूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून गुरुवारी प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या. राष्ट्रीय हवामान केंद्राने गुरुवारी सकाळी जास्तीत जास्त 108 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू कमकुवत होईल असं म्हटलं आहे.
शांघाई परिसरात वादळामुळे मेट्रो सेवाही बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शांघाईच्या दक्षिणेकडील निंगबो शहरात पाणी साचले. अनेक फूट साचलेल्या पाण्यात स्कूटर आणि कार बुडाल्या. मात्र, अधिकृतपणे केवळ काही रस्ते बंद करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.