China Drone: ट्रेस, ट्रॅक अन् टर्मिनेट...! रशिया-युक्रेन युद्धातून चीननं घेतला धडा; बनवलं जातंय घातक शस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:41 PM2022-06-07T17:41:34+5:302022-06-07T17:41:54+5:30
एक छोटासा ड्रोन शांतपणे शत्रुच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनावर लक्ष ठेवून हल्ला करू शकतो. या स्फोटात वरिष्ठ अधिकऱ्याची गाडी उडून जाते आणि त्यात बसलेले सर्व लोक ठार मारले जातात.
एक छोटासा ड्रोन शांतपणे शत्रुच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनावर लक्ष ठेवून हल्ला करू शकतो. या स्फोटात वरिष्ठ अधिकऱ्याची गाडी उडून जाते आणि त्यात बसलेले सर्व लोक ठार मारले जातात. काही सेकंदातच या हल्ल्याचे व्हिडिओ संपूर्ण जगभर व्हायरल होतात. हे ऐकायला काहीसं फिल्मी स्टोरीप्रमाणे वाटू शकेल. पण हे खरं ठरू शकतं.
फक्त कल्पना करा की आपला वरिष्ठ अधिकाऱ्याच्याच वाहनाला लक्ष्य केलं गेलंय आणि त्यात ते ठार झालेत हे जेव्हा सैन्याला कळत असेल तेव्हा काय परिस्थिती निर्माण होत असेल. रशिया-युक्रेन युद्धावर बारकाईने लक्ष ठेवणारा चीन आता आपल्या लष्करासाठी असेच स्मार्ट ड्रोन विकसित करण्याच्या तयारीत आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा माग काढतील आणि त्यांना मारतील.
रशिया-युक्रेन युद्धाला झाले तीन महिने
लष्करी महासत्ता रशिया देश तीन महिन्यांहून अधिक काळ कमी शक्तिशाली युक्रेन विरुद्धच्या युद्धात अजूनही अडकला आहे. युक्रेनच्या लष्करी ताकदीचा मोठा भाग तुर्की किंवा अमेरिकेकडून मिळवलेल्या ड्रोनमधून येतो. सुरुवातीच्या काळात जेव्हा रशिया आणि युक्रेनच्या युद्धनौका समोरासमोर होत्या, तेव्हा अमेरिकन ड्रोन आकाशातून रशियन जहाजांवर लक्ष ठेवून होते आणि युक्रेनला अचूक माहिती देत होते, ज्यामुळे त्यांना अचूक हल्ला करण्यात मदत झाली होती.
रशियन कमांडरवर हल्ले
युक्रेनियन सैन्याने ड्रोन हल्ल्यांमध्ये रशियन कमांडर्सना हेरून ठार मारलं, जे त्यांच्या ठावठिकाणाबद्दल अचूक माहिती मिळाल्यानं शक्य झालं. युक्रेनियन सैन्याकडे रशियन लष्करी ताफ्यांचा मार्ग, बाहेर पडण्याची वेळ, सुरक्षा व्यवस्था यासारखी सर्व माहिती अमेरिकन गुप्तचरांकडून देण्यात येत होती. ज्यामुळे त्यांनी रशियन पुरवठा साखळींवर प्रभावी हल्ले केले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या ताफ्यांवर बहुतांश हल्ले ड्रोनद्वारे करण्यात आले.
चीननं घेतला धडा
चीन सध्या तैवानसोबत तणावाच्या स्थितीत आहे. तैवानशी संघर्ष सुरू झाल्यास अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, अशी भीतीही चीनला वाटत आहे. चीन रशियन सैन्याला झालेल्या मोठ्या नुकसानीचे अत्यंत काळजीपूर्वक मूल्यांकन करत आहे आणि ते टाळण्याचे मार्गही शोधत आहे.
येत्या काही दिवसांच्या तयारीसाठी चीन अत्याधुनिक ड्रोन प्रणालीवर वेगाने काम करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या युक्रेनच्या लष्करानं अमेरिकेच्या मदतीनं केलेल्या ड्रोनवर चिनी सैन्यासोबतचं ड्रोनही चालवता येत नाहीत. त्यामुळेच चीन अशा ड्रोनवर काम करत आहे, जे सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या छायाचित्राच्या आधारे लष्करी अधिकाऱ्याची तात्काळ ओळख करू शकतात, त्यांच्या हालचालींवर नजर ठेवू शकतात आणि ओळख पटवून हल्ला करू शकतात. चीनला ही कमतरता दूर करायची आहे आणि सुरक्षित राहता येईल असे ड्रोन बनवायचे आहेत. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. शत्रूवर ताबडतोब हल्ला करू शकतो, जेणेकरून कमीत कमी वेळेत युद्ध यशस्वीपणे संपुष्टात आणता येईल यासाठी चीन नियोजन करत आहे.