चीनमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहेत. यातच चीनचे विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी, त्यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, चीनमधील जिनपिंग यांच्या विरोधकांकडून त्यांचा विरोध करायलाही सुरुवात केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लोक म्हणत आहेत, की जिनपिंग यांनी चीनला मागे नेले. कोरोना व्हायरस महामारीवर मात करण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने चीनचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर जिनपिंग यांनी शंघाय सारख्या मोठ्या शहरांना आपल्या मर्जीने बंद करून इकॉनमीवर मोठा हातोडा मारला आहे, असेही लोक म्हणत आहेत.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक शी जिनपिंगवर नाराज?एएनआयच्या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे. यासाठी त्यांच्या विरोधात मोहीमही राबवणातयेत आहे.
अधिकाधिक लोकांना जोडण्याचे आवाहन -चीनमधील लोकांना आवाहन करण्यात आले आहे, की त्यांनी आपले मित्र आणि नातलगांना सध्यस्थितीसंदर्भात माहिती द्यावी. जिनपिंग यांना सत्तेवरून दूर करावे. याच बरोबर, कायदा आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांचे सहकारी होऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेत अधिकाधीक लोकांना जोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.